प्रियांका चोप्राच्या आईने अंकिता लोखंडेला सुनावलं; म्हणाल्या ‘जंगली असल्यासारखं..’

बिग बॉसचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रत्येक स्पर्धक विजेतेपद मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न करतोय. अशातच मन्नारा चोप्राला एका टास्कदरम्यान घरातील इतर स्पर्धकांकडून वाईट वागणूक मिळाली. त्यावर अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियांका चोप्राच्या आईने अंकिता लोखंडेला सुनावलं; म्हणाल्या 'जंगली असल्यासारखं..'
Madhu ChopraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 11:33 AM

मुंबई : 20 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’ हा सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेला शो आहे. सलमान खानच्या या शोच्या ग्रँड फिनालेची अनेकांना उत्सुकता आहे. ग्रँड फिनालेपूर्वी या शोमध्ये बरेच ट्विस्ट येत आहेत. स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी इतकी चुरस रंगली आहे की, टास्कदरम्यान अनेकदा मर्यादाही ओलांडल्या जात आहेत. बिग बॉसच्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये विकी जैन आणि मुनव्वर फारुकी यांच्यात कडाक्याचं भांडण पहायला मिळालं. या भांडणात घरातील सर्व स्पर्धक सहभागी झाले होते. टास्कदरम्यान जेव्हा मन्नाराने मुनव्वरचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अंकिता तिच्यावर ओरडली. ईशा मालवीय आणि आयेशा खान यांनीसुद्धा मन्नारावर चुकीच्या पद्धतीने कमेंट्स केल्या आहेत. अंकिता आणि इतर स्पर्धकांच्या या वागण्यावरून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनीसुद्धा बिग बॉसच्या घरातील या भांडणावर टीका केली आहे.

बिग बॉसच्या घरातील भांडणाचा व्हिडीओ मन्नारा चोप्राच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला. त्या व्हिडीओवर कमेंट करत मधू चोप्रा यांनी अंकितासह इतर स्पर्धकांना सुनावलं आहे. ‘अरे देवा, ही लोकं जंगली असल्यासारखं वागतायत’, असं त्यांनी लिहिलं आहे. फक्त मधू चोप्राच नाही तर इतर सेलिब्रिटींनीही मन्नाराची बाजू घेतली आहे. अभिनेत्री पूजा भट्टने पोस्ट लिहित विकी जैनवर निशाणा साधला होता. ‘ती फक्त तिच्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करतेय. जेव्हा तुमच्या सर्व गोष्टी फेल ठरतात, तेव्हा तुम्ही महिलेवर टिप्पणी करता आणि मग स्वत:ला जेंटलमन म्हणवता. हे अजिबात कूल नाही,’ अशा शब्दांत पूजाने विकीला सुनावलं होतं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Mannara❤️ (@memannara)

मन्नारा चोप्रा ही प्रियांका आणि परिणीती चोप्रा यांची चुलत बहीण आहे. मन्नाराची आई ज्वेलरी डिझायनर असून त्या परिणीती आणि प्रियांका चोप्राच्या वडिलांच्या बहीण आहेत. या नात्याने मधू चोप्रा या मन्नाराच्या आत्या आहेत. मन्नाराने तेलुगू, तमिळ, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलंय. याआधी प्रियांका चोप्रानेही व्हिडीओ शेअर करत मन्नाराला पाठिंबा दर्शविला होता.

सध्या मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी यांनी बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. शेवटच्या वीकेंड का वार एपिसोडच्या आधी बिग बॉसच्या घरातून आयेशा खान आणि ईशा मालवीय बाद झाल्याचं कळतंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.