Priyanka Chopra | “मला प्रियांकाची अंडरवेअर..”, दिग्दर्शकाच्या मागणीनंतर ‘देसी गर्ल’ने जे केलं..

प्रियांका सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या हॉलिवूड सीरिजमुळे चर्चेत आहे. याशिवाय तिचा ‘लव्ह अगेन’ हा हॉलिवूड चित्रपटसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका तिच्या चित्रपटाचं आणि सीरिजचं जोरदार प्रमोशन करताना दिसतेय.

Priyanka Chopra | मला प्रियांकाची अंडरवेअर.., दिग्दर्शकाच्या मागणीनंतर 'देसी गर्ल'ने जे केलं..
Priyanka Chopra Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 9:14 AM

मुंबई : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीपासून लांब जाण्यामागचं कारण सांगितलं होतं. यावेळी तिने बॉलिवूडबाबत काही धक्कादायक खुलासेसुद्धा केले होते. इंडस्ट्रीतील लोकांनी मला एका कोपऱ्यात ढकललं होतं, टिकून राहण्यासाठी मला लोकांसोबत बीफ खावं लागलं होतं, अशी तक्रार तिने बोलून दाखवली होती. बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या राजकारणाला वैतागून हॉलिवूडला गेल्याचं तिने स्पष्ट केलं. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकाने एका दिग्दर्शकासोबतचा धक्कादायक किस्सा सांगितला आहे. शूटिंगदरम्यान संबंधित दिग्दर्शकाने प्रियांकाचे अंतर्वस्त्र पाहण्याची मागणी केली होती.

एका प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने सांगितलं की ही घटना 2002-2003 मधली आहे. एका चित्रपटात ती अंडरकव्हर गर्लची भूमिका साकारत होती. प्रियांका त्यावेळी इंडस्ट्रीत नवीनच होती आणि ती अशा दिग्दर्शकासोबत काम करत होती, ज्यांना ती आधी भेटलीसुद्धा नव्हती. “अंडरकव्हर एजंटची भूमिका असल्याने एका मुलाला आपल्याकडे आकर्षिक करण्याचा तो सीन होता. त्यासाठी मला कपडे काढायचे होते. त्यावेळी दिग्दर्शकांनी मागणी केली की, मला तिचे अंतर्वस्त्र पाहायचे आहेत. अन्यथा हा चित्रपट कोण पहायला येईल?”, असं तिने सांगितलं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाचे अंतर्वस्त्र पाहण्याची मागणी दिग्दर्शकाने थेट तिच्याशी केली नव्हती. मात्र तिच्या स्टायलिस्टला त्याने तसे निर्देश दिले होते. ही वागणूक अत्यंत अमानवीय असल्याचं प्रियांका म्हणाली. “माझ्या कलेचं त्यांना महत्त्व नव्हतं, मी जे काम करत होती, त्याबद्दल त्यांना आदर नव्हता”, असं ती पुढे म्हणाली. दोन दिवस काम केल्यानंतर अखेर प्रियांकाने तो चित्रपट सोडून दिला. प्रॉडक्शन हाऊसला आपल्या खिशातून पैसे देऊन प्रियांकाने त्या प्रोजेक्टला रामराम केला.

डॅक्स शेफर्डच्या पॉडकास्टमध्ये प्रियांका बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. “मला इंडस्ट्रीत एका कोपऱ्यात ढकललं गेलं होतं. मला कोणत्याच भूमिका मिळत नव्हत्या. बॉलिवूडमधल्या राजकारणाला मी वैतागले होते आणि थकले होते. त्यातून मला ब्रेक हवा होता. म्हणून मी अमेरिकेला आहे”, असं प्रियांका म्हणाली होती.

प्रियांका सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या हॉलिवूड सीरिजमुळे चर्चेत आहे. याशिवाय तिचा ‘लव्ह अगेन’ हा हॉलिवूड चित्रपटसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका तिच्या चित्रपटाचं आणि सीरिजचं जोरदार प्रमोशन करताना दिसतेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.