Priyanka Chopra हिचं बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाली, ‘थोडे जास्त पैसे मागितल्यानंतर… ‘

प्रियांका चोप्रा हिचं बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य; मिळणाऱ्या मानधनाबाबत अभिनेत्री झाली व्यक्त... 'देसी गर्ल' सध्या तिच्या आगामी सिनेमांमुळे तुफान चर्चेत... जाणून घ्या आता काय म्हणाली अभिनेत्री...

Priyanka Chopra हिचं बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाली, 'थोडे जास्त पैसे मागितल्यानंतर... '
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 4:52 PM

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. प्रियांकाने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता देखील अभिनेत्री ‘सिटाडेल’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेत्री सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बॉलिवूडमध्ये हवी तशी संधी न मिळाल्यामुळे हॉलिवूडच्या दिशेने मोर्चा वळवला असल्याचं वक्तव्य अभिनेत्रीने यापूर्वी केल होतं. आता देखील अभिनेत्री बॉलिवूडबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी प्रियांका बॉलिवूडमध्ये मिळणाऱ्या मानधनाबाबत म्हणाली आहे. अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांकाने अभिनेत्री आणि अभिनेत्यांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. भारतात कायम अभिनेत्यांपेक्षा कमी मानधनामध्येच काम करावं लागेल असं अभिनेत्रीला वाटत होतं. प्रियांकाने अनेक वर्ष भारतात काम केलं, पण जेव्हा अभिनेत्रीने अभिनेत्याला जेवढं मानधन मिळत आहे, तेवढ्याच मानधनाची मागणी केल्यानंतर अभिनेत्रीची निराशा झाली.

अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या एजन्टने मला सांगितलं की, तू सह-प्रमुख भूमिका बजावत आहेस, तर तुला देखील बरोबरीने पैसे मिळायला हवे असं आम्ही सांगू… मला असं वाटलं प्रयत्न करुया. पण असं होईल यावर माझा विश्वास बसला नाही. कारण इतकी वर्ष मी यासाठी लढली होती… ‘ भारतात समान मानधनाबाबत अभिनेत्रीला विचारलं..

हे सुद्धा वाचा

यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी कधीही समानतेबद्दल म्हणाली नाही. मी फक्त थेडे पैसे वाढवून मागितले, तर मला ते मिळाले नाहीत. त्यामुळे माझा संघर्ष संपवला.’ सध्या अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा रंगत आहे.

‘सिटाडेल’ सीरिजशिवाय अभिनेत्री ‘जी ले जरा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात प्रियांका, अभिनेत्री कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्यासोबत एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. मध्यंतरी अभिनेत्री बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती.

बॉलिवूडबद्दल काय म्हणाली प्रियांका चोप्रा?

प्रियांका म्हणाली, ‘इंडस्ट्रीने मला एका बाजूला करुन दिलं. लोक मला सिनेमांमध्ये ऑफर करत नव्हते. मला काही खेळ खेळता येत नाहीत. बॉलिवूडमधील राजकारण मला जमलं नाही. म्हणून मी थकली होती. त्यानंतर मला ब्रेक हवा आहे असं मी म्हणाली….’ बॉलिवूडबद्दल प्रियांकाने केलेलं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.