फोटोग्राफर मानव मंगलानी यांचा सायना नेहवालला पाठिंबा, तर सिद्धार्थला कव्हर करणार नसल्याची घोषणा

सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी सायनाला पाठिंबा दिला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलंय, 'मी यापुढे सिद्धार्थला कव्हर करणार नाही. मानव यांची पोस्ट सायना नेहवालनेही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

फोटोग्राफर मानव मंगलानी यांचा सायना नेहवालला पाठिंबा, तर सिद्धार्थला कव्हर करणार नसल्याची घोषणा
सायना नेहवाल आणि सिद्धार्थ
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 4:47 PM

अभिनेता सिद्धार्थचं (actor siddharth)वादग्रस्त विधान चर्चेत आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवालबाबत (saina nehwal)आक्षेपार्ह विधान केलंय. या प्रकरणी सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी(ptotographer manav mangalani) यांनी सायनाला पाठिंबा दिला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलंय, ‘मी यापुढे सिद्धार्थला कव्हर करणार नाही.’ मानव यांची पोस्ट सायना नेहवालनेही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

फोटोग्राफर मानव मंगलानी यांची पोस्ट

मानव मंगलानी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ‘सिद्धार्थची ही पोस्ट त्याचे संस्कार आणि त्याच्या घाणेरड्या मानसिकतेची साक्ष देते. त्याचं हे विधान मला पटलेलं नाही. त्यामुळे मी इथून पुढे त्याला कव्हर करणार नाही. गेट वेल सून, सिद्धार्थ!’

सायना नेहवालचं विधान काय आहे?

सायनाने नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदी पंजाबमध्ये गेले असता त्यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणावर सायना व्यक्त झाली. तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहीलंय, ‘देशाचे पंतप्रधानच सुरक्षित नसतील तर दुसरं कुणी कसं सुरक्षित राहु शकेल. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत जे झालं त्याचा मी निषेध करते.’

सिद्धार्थच्या आक्षेपार्ह विधानाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

सिद्धार्थच्या विधानाची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी महिला आयोगाने मुंबई पोलिस आणि ट्विटरकडून अहवाल मागवला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विट केले की, ‘महिला आयोग या प्रकरणाची माहिती घेत ​​आहे.’

सिद्धार्थने ‘रंग दे बसंती’,’चश्मे बद्दूर’या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याआधीही सिद्धार्थने अनेकदा भाजपवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या-

विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची लेक वामिकाचा आज पहिला वाढदिवस, विरूष्काच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

कतरीनासोबत लग्न झाल्याचा आनंद, धनुषच्या ‘राउडी बेबी’वर विकी कौशलचा भन्नाट डान्स

Lata Mangeshkar COVID | गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूमध्ये दाखल

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.