Pulwama Attack: जावेद अख्तर आणि शबाना आझमींवर कंगणांचं टीकास्त्र

मुंबई : जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. सर्वत्र पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी, निषेध सुरु आहे. बॉलिवूडमध्येही पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून  बॉलिवूड गीतकार, संवादलेखक जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. हे दोघेही पाकिस्तानमधील कराची येथील आर्ट काऊन्सिलमध्ये सहभागी […]

Pulwama Attack: जावेद अख्तर आणि शबाना आझमींवर कंगणांचं टीकास्त्र
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

मुंबई : जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. सर्वत्र पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी, निषेध सुरु आहे. बॉलिवूडमध्येही पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून  बॉलिवूड गीतकार, संवादलेखक जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. हे दोघेही पाकिस्तानमधील कराची येथील आर्ट काऊन्सिलमध्ये सहभागी होणार होते. मात्र या दोघांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करत आपला दौरा रद्द केला आहे.

जावेद अख्तर हे कवी कैफी आजमींच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहणार होते. मात्र पुलवामा येथील झालेला हल्ला पाहून जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला जाणे रद्द केले, अशी माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली.  “मला आणि शबानाला कैफी आजमी आणि त्यांच्या कवितांवर होणाऱ्या एका कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. मात्र आता आम्ही या कार्यक्रमाला जाणं रद्द केलं आहे. 1965 मध्ये भारत-पाक युद्धादरम्यान कैफी साहेब यांनी एक कविता लिहिली होती. ‘और फिर कृष्णा ने अर्जुन से कहा’ “, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं.

जावेद अख्तर यांच्या नंतर शबाना आझमी यांनीही ट्वीट करत पाकिस्तान दौरा रद्द केला असल्याची माहिती दिली. “मला दोन दिवसांच्या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला आम्ही जाणार होतो. मात्र मी कराची आर्ट काऊन्सिलचे आभार व्यक्त करते की, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपाला कार्यक्रम रद्द केला”, असं शबाना आझमी यांनी म्हटलं.

शबाना यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्य सांगितले, “भारत आणि पाकिस्तानच्या संस्कृतीमध्ये बदल होऊ शकत नाही. कारण आमचे जवान आमच्यासाठी जीव गमावत आहेत. मी पूर्णपणे शहीद जवानांच्या कुटुंबासोबत आहे”.

कंगना रानावतची टीका

जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर अभिनेत्री कंगना रानावतने या दोघांवर टीका केली आहे. कंगना म्हणाली, शबाना आझमीं यांनी सांस्कृतिक आदान-प्रदानवर केलेले वक्तव्य खूप आश्चर्यकारक आहे. कारण हे तेच लोक आहेत, ज्यांनी भारत तेरे तुकडे होंगेला समर्थन केलं होतं. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कलाकारांवर देशात बंदी घातली असतानाही कराचीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करणे याचा अर्थ काय?, असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला आहे.

व्हिडीओ : शहीद जवानंचं पार्थिव औरंगाबादला नेणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.