पुण्यात रिसॉर्टमध्ये अभिनेत्रीवर बलात्कार; पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून सतत बलात्कार केल्याचा आरोप एका अभिनेत्रीने केला आहे. याप्रकरणी विराज पाटील नावाच्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 2023 पासून हे प्रकरण घडत आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुण्यात रिसॉर्टमध्ये अभिनेत्रीवर बलात्कार; पोलिसांत गुन्हा दाखल
लग्नाचं आमिष दाखवून पुण्यात अभिनेत्रीवर बलात्कारImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 9:25 AM

विनय जगताप, पुणे : 28 जानेवारी 2024 | पुण्यात सिनेअभिनेत्रीवर रिसॉर्टमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विराज पाटील नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार झाल्यानंतर अभिनेत्रीच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून तिला ठार मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली आहे. या प्रकरणी 35 वर्षीय विराज पाटीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी या अभिनेत्रीने तक्रार दाखल केली होती. अभिनेत्री आणि विराज यांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. विराजने पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करेन असं म्हणत अभिनेत्रीवर पुण्यातल्या मुळशी भागातील रिसॉर्टमध्ये वेळोवेळी बलात्कार केला. लग्नाचं आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, असं अभिनेत्रीने तक्रारीत म्हटलंय.

2023 पासून प्रकरण सुरू

27 ऑगस्ट 2023 पासून 20 जानेवारी 2024 या कालावधीत विमाननगर आणि मुळशी भागातील रिसॉर्टमध्ये सातत्याने बलात्कार झाल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. त्यानंतर पीडिताने फोन केल्यानंतर आरोपीने ते फोनसुद्धा उचलणं बंद केलं होतं. माझ्या घरच्यांना का टाळत आहेस? फोन का उचलत नाही, असा प्रश्न विराजला महिलेनं विचारल्यावर त्याने शिवीगाळ केली. तसंच त्याच्याकडे असलेलं पिस्तूल तरुणीच्या डोक्यावर ठेवून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही आणि तू जर पोलिसांकडे गेली तर तुला मी दाखवतो कोण आहे, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

विराज पाटील हा राजकीय पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असून पीडित महिला अभिनेत्री आहे. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमीचा फायदा विराज पाटील घेत होता. त्यातूनच त्यांची पुढे ओळख वाढत गेली आणि पुढे हा सगळा प्रकार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.