‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने घेतली नाही फी; तरीही कमावणार कोट्यवधी, काय आहे स्ट्रॅटेजी?

'पुष्पा'चा पहिला भाग ब्लॉकबस्टर झाल्यानंतर आता दुसऱ्या भागात काहीतरी हटके दाखवण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. यासाठी चित्रपटातील काही सीन्सचं शूटिंग खतरनाक लोकेशन्सवर करण्यात येणार आहे. ज्याठिकाणी जवळपास 178 हत्या झाल्या आहेत, त्या ठिकाणी ही शूटिंग होणार असल्याचं कळतंय.

'पुष्पा 2'साठी अल्लू अर्जुनने घेतली नाही फी; तरीही कमावणार कोट्यवधी, काय आहे स्ट्रॅटेजी?
Pushpa 2
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 12:45 PM

मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | ‘पुष्पा : द राईज’ या ब्लॉकबस्टर पॅन इंडिया चित्रपटानंतर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आता ग्लोबल सुपरस्टार झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. इतकंच नव्हे तर यातील भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसुद्धा मिळाला होता. आता प्रेक्षकांना ‘पुष्पा : द रुल’ या सीक्वेलची प्रचंड उत्सुकता आहे. ‘पुष्पा 2’विषयी आता महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. अल्लू अर्जुनच्या मानधनाविषयीही ही अपडेट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी काहीच मानधन घेतलेलं नाही.

मध्यंतरी अशी जोरदार चर्चा होती की ‘पुष्पा’च्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याचं मानधन वाढवलंय. सीक्वेलसाठी तो खूप मोठी रक्कम स्वीकारणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र नव्या अपडेटनुसार, अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी काहीच फी घेतली नाही. मात्र तरीसुद्धा अल्लू अर्जुन कोट्यवधी रुपयांत कमाई करणार आहे. यासाठी त्याची स्ट्रॅटेजी समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

‘पुष्पा 2’मधील भूमिकेसाठी अल्लू अर्जुनने सध्या कोणतंच मानधन घेतलं नसलं तरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या एकूण कमाईपैकी 33 टक्के भाग त्याला मिळणार आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास, जर या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांचा गल्ला जमवला तर अल्लू अर्जुनला त्यापैकी 33 टक्के भाग मिळणार आहे. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा अधिक कमाई करणार असल्याचा विश्वास अल्लू अर्जुनला आहे. म्हणूनच त्याने निर्मात्यांसोबत ही वेगळी डील केली आहे.

‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंगचे हक्क ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने 30 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता दुसऱ्या भागाचे हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी नेटफ्लिक्सने ॲमेझॉन प्राइम व्हिडीओपेक्षा तिप्पट रक्कम दिली आहे.

अल्लू अर्जुनला त्याच्या ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटासाठी नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ मिळाला. यानिमित्ताने अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे. ‘पुष्पा 1’ हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रचंड उत्सुकता आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.