‘पुष्पा’ फेम अभिनेत्रीचा लिपलॉक फोटो व्हायरल; नेटकरी म्हणाले ‘पैशांसमोर प्रेमही खोटंच..’

पुष्पाचा पहिला भाग हिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने सीक्वेलसाठी दुप्पट फी आकारली आहे. ‘पुष्पा : द रूल’साठी त्याने तब्बल 85 कोटी रुपये स्वीकारल्याचं कळतंय. हा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतला एक नवीन रेकॉर्ड बनला आहे.

'पुष्पा' फेम अभिनेत्रीचा लिपलॉक फोटो व्हायरल; नेटकरी म्हणाले 'पैशांसमोर प्रेमही खोटंच..'
Anasuya BharadwajImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 11:01 AM

मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. आता या चित्रपटाचा सीक्वेल लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटात मंगलम श्रृणूची पत्नी दक्षायिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनसुया भारद्वाज या दुसऱ्या भागातही झळकणार आहे. त्यापूर्वी अनसुया तिच्या खासगी फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर पतीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र यातील तिच्या लिपलॉकच्या फोटोची अधिक चर्चा होत आहे. अनसुया आणि तिच्या पतीच्या या खासगी फोटोंवर नेटकरी कमेंट्स करत आहेत.

सध्या अनसुया तिच्या पतीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. समुद्रकिनाऱ्यावरील काही फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोमध्ये दोघं बीचवर लिपलॉक करताना दिसत आहेत. 4 जून रोजी अनसुयाने तिच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त तिने पतीसाठी सोशल मीडियावर पोस्टसुद्धा लिहिली होती. अनसुयाने शशांक भारद्वाजशी लग्न केलं आहे. या दोघांच्या फोटोंवरून काहींनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘पैसे असले की सगळं शक्य होतं’, असं एकाने म्हटलंय. तर ‘पैशांसमोर प्रेम हे खोटंच असतं’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

अनसुयाने तिच्या पतीसोबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं, ‘मला अजूनही ते पहिलं प्रेमपत्र आठवतंय, जे तू 23 जानेवारी 2001 रोजी लिहिलं होतंस. आम्ही दिल्लीच्या एका कार्यक्रमात सहभागी झालो होतो. मी तुझ्या पत्राचं उत्तर दिलं नव्हतं’, असं लिहित तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुष्पा 2 मध्ये अनसुयाची भूमिका अत्यंत वेगळी आणि नव्या रुपात पहायला मिळणार आहे. सीक्वेलमध्ये ती सूड घेताना दिसणार आहे. गेल्या 10-11 वर्षांपासून ती इंडस्ट्रीत काम करतेय. सुरुवातीला ती अँकर म्हणून काम करत होती.

पुष्पाचा पहिला भाग हिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने सीक्वेलसाठी दुप्पट फी आकारली आहे. ‘पुष्पा : द रूल’साठी त्याने तब्बल 85 कोटी रुपये स्वीकारल्याचं कळतंय. हा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतला एक नवीन रेकॉर्ड बनला आहे. पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता दुसऱ्या भागात काहीतरी हटके दाखवण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. यासाठी चित्रपटातील काही सीन्सचं शूटिंग खतरनाक लोकेशन्सवर करण्यात येणार आहे. ज्याठिकाणी जवळपास 178 हत्या झाल्या आहेत, त्या ठिकाणी ही शूटिंग होणार असल्याचं कळतंय.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.