'स्टायलिश स्टार' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपुरताच नाही तर संपूर्ण जगभरात दमदार कलाकार म्हणून प्रसिद्ध आहे. 'पुष्पा' या त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत अल्लू अर्जुन अग्रस्थानी आहे. एका चित्रपटासाठी तो सुरुवातील जवळपास दहा कोटी रुपये इतकं मानधन घ्यायचा. प्रसिद्धी आणि लोकप्रियतेनुसार त्याचं हे मानधन वाढत गेलं.
'पुष्पा: द राईज' या पहिल्या भागाच्या यशानंतर आता 'पुष्पा: द रूल' या दुसऱ्या भागाच्या नफ्यातील काही टक्के त्याला मिळणार आहेत. पुष्पा या पहिल्या भागासाठी त्याने तब्बल 50 कोटी रुपये घेतल्याची माहिती आहे.
अल्लू अर्जुनने 'गंगोत्री' या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यापूर्वी त्याने बालकलाकार म्हणूनही काम केलं होतं. गेल्या काही वर्षांत त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्याची एकूण संपत्ती 180 कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातं.
हैदराबादमधील ज्युबिली हिल्स परिसरात त्याचा आलिशान बंगला आहे. पत्नी स्नेहा रेड्डी आणि दोन मुलांसोबत तो या घरात राहतो. या घराची किंमत जवळपास 100 कोटी इतकं असल्याचं म्हटलं जातं.