Allu Arjun | ‘पुष्पा’स्टार अल्लू अर्जुनकडून गेला ‘आइकन’, काय आहे चित्रपट गमावण्याचं कारण?, अल्लू अर्जुन सध्या काय करतोय?

‘पुष्पा’ (Pushpa) स्टार अल्लू अर्जुनचे दिग्दर्शक सुकुमार यांनी आता 'पुष्पा: द रूल' (Pushpa: The Rise) आल्यानंतर आणि सुपरहिट झाल्यानंतर पुढच्या वाटचालीला सुरूवात केली आहे. 'पुष्पा: द रूल' यानंतर अल्लू अर्जुन या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी काम करणार आहे. आधीच पुष्पा चांगलाच सुपरहिट झाल्यानं आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं घसघशीत कमाई केल्यानं अल्लू अर्जुन सध्या चर्चेत आहेत.

Allu Arjun | 'पुष्पा'स्टार अल्लू अर्जुनकडून गेला 'आइकन', काय आहे चित्रपट गमावण्याचं कारण?, अल्लू अर्जुन सध्या काय करतोय?
Allu Arjun
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 2:05 PM

मुंबई : ‘पुष्पा’ (Pushpa) स्टार अल्लू अर्जुनचे दिग्दर्शक सुकुमार यांनी आता ‘पुष्पा: द रूल’ (Pushpa: The Rise) आल्यानंतर आणि सुपरहिट झाल्यानंतर पुढच्या वाटचालीला सुरूवात केली आहे. ‘पुष्पा: द रूल’ यानंतर अल्लू अर्जुन या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी काम करणार आहे. आधीच पुष्पा चांगलाच सुपरहिट झाल्यानं आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं घसघशीत कमाई केल्यानं अल्लू अर्जुन सध्या चर्चेत आहेत. या चित्रपटानं सुपरहिट चित्रपट होण्याचे ठोकताळेच बदलून टाकले. मोठं यश मिळाल्यानं सध्या पुष्पाची सर्वच टीम आनंद घेत आहे. आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. तो चित्रपट कसा असेल त्यात काय असेल, त्यामध्ये अल्लूची भूमिका बदलेले की पुन्हा आपल्याला तो त्याच भूमिकेत काय विशेष असले अशा अनेक विषयांच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या सगळ्या धावपळीत अल्लू अर्जुनला ‘आइकन’ हा चित्रपट गमवावा लागला. कारण, त्यासाठी त्याला पुष्पा चित्रपटामुळे वेळ देणं शक्य नव्हतं. त्यामुळे अल्लू अर्जुन पूर्णपणे पुष्पाच्या दुसऱ्या भागाकडे लक्ष देत आहे.

‘पुष्पा’चा दुसरा भाग लवकरच!

‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी आता पुष्पाच्या दुसऱ्या भागासाठी तायरी सुरु केली आहे. याचं प्लानिंग केलं जात आहे. यामुळेच कदाचित अल्लू अर्जून त्याच्या हातातील इतर चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचीही चर्चा आहे. कारण पुष्पाच्या दुसऱ्या भागासाठी काम करताना अल्लू अर्जुन त्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं काम करणार असल्याचं बोललं जात आहे. पुष्पाच्या दुसऱ्या भागाचं शुटिंग झाल्यानंतर अल्लू इतर चित्रपटात काम करु शकेल. त्यामुळे अल्लू अजूननं ‘आइकन’ हा चित्रपट केला नाही आणि पूर्णपणे आपलं लक्ष्य पुष्पाकडेच केंद्रीय केलंय.

‘आइकन’साठी कुणाला ऑफर

एकीकडे ‘पुष्पा’च्या ‘पुष्पा: द रूल’ या दुसऱ्या भागाची शुटिंग सुरु आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनने ‘आइकन’मध्ये काम करण्यास नकार दिल्यानं चित्रपटाच्या दिग्दर्शकानं नव्या चेहऱ्याचा शोध सुरु केला आहे. बॉलिवूडमधील सूत्रांनुसार अल्लू अर्जुन पुष्पाच्या दुसऱ्या भागात व्यस्त असल्यानं त्याला हा चित्रपट करता येत नाहीये. मात्र, ‘आइकन’मध्ये काम करण्याची अल्लू अर्जुनला इच्छा होती. पण, नकार दिल्यानं आता चित्रपटाचे निर्माते अखेर कुणाला साईन करणार. हे पहावं लागेल. अभिनेता राम पोथिनेनी यांना या चित्रपटासाटी ऑफर असल्याचीही चर्चा आहे. आता पोथिनेनी यांनी हो म्हणल्यास अर्जुनची संधी जाऊ शकते. होम प्रोडक्शन आणि दिल राजू मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची देखील चर्चा आहे. आता अल्लू अर्जुन काय निर्णय घेणार, ‘आइकन’साठी काम करणार की आपला ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठीच मेहनत घेणार, ते येत्या काळातच कळेल.

इतर बातम्या

अमिताभ बच्चन यांनी ‘झूंड’चं एक दिवसही प्रमोशन का केलं नाही? चर्चांना उधाण, चांगला पिक्चर रखडतोय?

Poonam Pandey | पूनम पांडेचे सनसनाटी आरोप ईगोमुळे, पती सॅम बॉम्बेच्या आरोपांनी खळबळ

अमिताभ नावाचं गारुड कित्येक वर्षापासूनच आहे; नागराज उगाच म्हणत नाही माझं स्वप्न होतं…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.