Pushpa 2 | कुठे आहे पुष्पा? खास व्हिडीओने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता, 7 एप्रिल रोजी काय होणार?

पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाची छोटी झलक प्रदर्शित होणार आहे. स्टायलिश स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी ही खास भेट असेल.

Pushpa 2 | कुठे आहे पुष्पा? खास व्हिडीओने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता, 7 एप्रिल रोजी काय होणार?
Pushpa 2Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 3:33 PM

मुंबई : बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा : द रूल’ या चित्रपटाचा खास व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पुष्पा’च्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्कंठा वाढत असतानाच प्रॉडक्शन हाऊसने नुकताच हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून ‘पुष्पा’ कुठे आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकसुद्धा उत्सुक झाले आहेत. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘पुष्पा : द रूल’मध्ये अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांची टक्कर पहायला मिळणार आहे. पुष्पासोबतच श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदाना यामध्ये मुख्य भूमिकेत असेल.

डिसेंबर 2021 मध्ये पुष्पाराज हे पात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि त्याने संपूर्ण देशाला अक्षरश: वेड लावलं. गल्लीबोळ्यापासून ते क्रिकेट स्टेडियम, राजकीय रॅली आणि कॉर्पोरेट बोर्डरुम्सपर्यंत या चित्रपटाचे डायलॉग्स गाजले. इतकंच नव्हे तर लग्नापासून ते क्लबमधील पार्ट्यापर्यंत ‘पुष्पा’मधील गाण्यांवर लोकांनी ठेका धरला. आता या सीक्वेलमध्ये नेमकं काय घडणार आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हे सुद्धा वाचा

पुष्पा तिरुपतीमधील तुरुंगातून पळून गेला आणि आता बेपत्ता झाला आहे. पुष्पा कुठे आहे असा प्रश्न या व्हिडीओतून प्रेक्षकांना विचारण्यात आला आहे. या चित्रपटाचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडीओ येत्या 7 एप्रिल रोजी म्हणजेच अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पहा व्हिडीओ

पुष्पा 2 हा पहिल्या भागापेक्षा अधिक रंजक करण्याचा प्रयत्न निर्माते-दिग्दर्शकांचा आहे. त्यामुळे या सीक्वेलमध्ये दमदार कलाकारांची वर्णी लागली आहे. या चित्रपटात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. पुष्पा 2 मध्ये साई एका आदिवासी मुलीची भूमिका साकारणार आहे. अल्लू अर्जुनसोबत तिला 20 मिनिटांचा स्क्रीन टाइम दिला जाईल. मात्र ही भूमिका कथेसाठी अत्यंत महत्त्वाची असेल.

पुष्पा 2 चं शूटिंग यावर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत संपणार असल्याचं समजतंय. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाची छोटी झलक प्रदर्शित होणार आहे. स्टायलिश स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी ही खास भेट असेल.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.