Raanbaazaar: ‘रानबाजार’च्या पुढील भागांची उत्सुकता; मल्टीस्टारर वेब सीरिजचा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

या सीरिजला प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत या सीरिजचे पाच भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रेक्षकांना पुढील भागाची उत्सुकता आहे.

Raanbaazaar: 'रानबाजार'च्या पुढील भागांची उत्सुकता; मल्टीस्टारर वेब सीरिजचा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
RaanbaazaarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 2:10 PM

‘रानबाजार’ (Raanbaazaar) या वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वेब सीरिजची कथा तर उत्तम आहे. परंतु या कथेला सत्यात उतरवायचं काम दमदार कलाकारांनी केलं आहे. या सीरिजला प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत या सीरिजचे पाच भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रेक्षकांना पुढील भागाची उत्सुकता आहे. पुढील भाग येत्या 3 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. कारण प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या या वेब सीरिजमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या आणि अनुभवी कलाकारांच्या समावेश आहे. यात तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), प्राजक्ता माळी (Prajakta Mali), मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे, वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार हे नावाजलेले कलाकार दिसत आहेत.

पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असणाऱ्या या सीरिजमध्ये मोहन आगाशे हे सतीश नाईक या भूमिकेत आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची व्यक्तिरेखा अगदी हुबेहूब साकारली आहे. तर मकरंद अनासपुरे हे दिवेकर ही व्यक्तिरेखा साकारत आहेत, ते अगदी अनुभवी राजकारण हलवणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर दिग्दर्शक अभिजित पानसे हे पहिल्यांदा अभिनय करताना दिसत आहेत. त्यांनी इन्स्पेक्टर चारुदत्त मोकाशी ही भूमिका साकारली आहे आणि मोहन जोशी हे सयाजी पाटील यांच्या भूमिकेत दिसत आहेत. सचिन खेडेकर युसुफ पटेल साहेब ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तर वैभव मांगले हे इस्पेक्टर पालांडे या भूमिकेत दिसत आहेत. उर्मिला कोठारेने निशा जैन ही व्यतिरेखा साकारली आहे. माधुरी पवार ही सयाजी पाटील यांची मुलगी प्रेरणा सयाजीराव पाटील या व्यक्तिरेखेत दिसत आहे. या सर्व तगड्या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

हे सुद्धा वाचा

प्राजक्ता माळीची पोस्ट-

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेब सीरिजमध्ये कलाकारांचा मोठा फौजफाटा आहे. अभिजित पानसेने ही वेब सीरिज उच्च पातळीवर नेऊन ठेवली आहे. त्यात मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या सर्व तगड्या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे ‘रानबाजार’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्याकडून पुढील भाग लवकर प्रदर्शित करा, अशी मागणी केली जात आहे. या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून अभिजित पानसे आणि ‘रानबाजार’ संपूर्ण टीमने केलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे लक्षात येते.”

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.