‘तर ऐश्वर्या रायचा बलात्कार करायला मिळालं असतं’; अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य

'लियो' या चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणाऱ्या मंसूर अली खानने अभिनेत्री तृषा कृष्णनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त झाला. आता आणखी एका अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये तो ऐश्वर्याबद्दल बोलताना दिसतोय.

'तर ऐश्वर्या रायचा बलात्कार करायला मिळालं असतं'; अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य
Aishwarya Rai Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 8:36 AM

मुंबई : 23 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री तृषा कृष्णनविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने अभिनेता मंसूर अली खानविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मंसूर यांनी एका चित्रपटातील बेडरुम सीनवरून तृषाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. “जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचा आहे, तेव्हा मी विचार केला की एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन, जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी याआधीही बलात्काराचे अनेक सीन्स शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही. मात्र काश्मीरमध्ये शूटिंग सुरू असताना मला तृषाला पहायलासुद्धा दिलं गेलं नाही”, असं तो म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तृषानेही त्यावर प्रतिक्रिया देत मंसूरसोबत कधीच काम करणार नसल्याची भूमिका घेतली. यादरम्यान आता सोशल मीडियावर अभिनेता-राजकारणी राधा रवी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल धक्कादायक वक्तव्य करताना दिसत आहेत.

राधा रवी यांचा हा व्हिडीओ गायिका चिन्मयी श्रीपदाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने त्यांच्यावरही कारवाई का झाली नाही, असा सवाल केला आहे. या व्हिडीओत राधा रवी हे तमिळमध्ये बोलत आहेत. चिन्मयीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याचं भाषांतर इंग्रजीत केलं आहे. ‘मी एकदा म्हटलं होतं की जर मला हिंदी बोलता आलं असतं तर मला ऐश्वर्या रायचा बलात्कार करायला मिळाला असता. मला असं म्हणायचं होतं की मला तिच्यासोबत बॉलिवूडमध्ये काम करायला मिळालं असतं. मला तमिळमध्ये या पापी लोकांसोबत काम का करावं लागलं असतं’, असं राधा रवी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

आश्चर्याची बाब म्हणजे राधा रवी यांच्या या वक्तव्यावर उपस्थित प्रेक्षक जोरजोरात हसू लागतात. राधा रवी यांनीसुद्धा मंसूर अली खानप्रमाणेच आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. ‘या व्यक्तीने ऐश्वर्या रायबद्दल इतकी वाईट टिप्पणी केली. मला हे जाणून घ्यायचं आहे की कोणालाच त्या व्यक्तीविरोधात कारवाई कराविशी वाटली नाही का’, असा सवाल चिन्मयीने हा व्हिडीओ पोस्ट करत केला आहे. काहींनी असंही म्हटलंय की चिन्मयीने अर्धवट भाषांतर केलं आहे. राधा रवी चित्रपटांमधील नकारात्मक भूमिकांबद्दल बोलत होते, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘राधा रवी हे त्यांना मिळणाऱ्या भूमिकांबद्दल बोलत आहेत. त्यांना तमिळ भाषा येते म्हणून त्यांना तमिळ अभिनेत्रींच्या बलात्कारांच्या भूमिका मिळतात. जर हिंदी आली असती तर ऐश्वर्या रायसोबतचे सीन्स मिळते’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.