Parineeti Raghav | परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी घेतला हनिमूनबद्दल मोठा निर्णय, अभिनेत्री थेट
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न काही दिवसांपूर्वीच पार पडले. यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी उदयपूरमध्ये 24 सप्टेंबर रोजी लग्न केले. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने पार पडले. अत्यंत खास लोकांची उपस्थिती या लग्न सोहळ्यास राहिली. लीला पॅलेज आणि ताज लेक पॅलेजमध्ये यांचे लग्न पार पडले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित होते.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही विदेशात झाली. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या लग्नामध्ये कोट्यवधी रूपये खर्च केले. विविध कार्यक्रमांचे आयोजन यांनी केले. लग्नाच्या आदल्यादिवशीच जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे हनिमूनला कुठे जाणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली. मात्र, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी मोठा निर्णय घेतलाय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे सध्याच हनिमूनला जाणार नसल्याचे सांगितले जातंय. सध्या परिणीती चोप्रा ही आपल्या नव्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतंय.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे लग्नानंतर आता काही दिवसांमध्येच आपल्या कामाला सुरूवात करताना दिसणार आहेत. दिल्लीमध्ये सध्या चड्ढा कुटुंबासोबत परिणीती वेळ घालवत आहे. त्यानंतर ती मुंबईमध्ये आपल्या कामावर परतणार आहे. राघव चड्ढा याला देखील संसदच्या शीतकालीन सत्राची तयारी करायची आहे.
परिणीती चोप्रा ही काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये दाखल होत आपल्या कामाला सुरूवात करणार आहे. रानीगंज या चित्रपटाचे काम करताना परिणीती चोप्रा ही दिसेल. यामुळेच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हनिमूनला जाणार नाहीत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नातील अनेक फोटो हे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा हा अत्यंत शाही पद्धतीने पार पडल्याचे दिसतंय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची जोडी चाहत्यांना चांगलीच आवडल्याचे दिसतंय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा देखील दिल्लीमध्ये अत्यंत खास प्रकारे पार पडला. या साखरपुड्याला प्रियांका चोप्रा ही देखील उपस्थित होती.