Love Live | ‘लग्नाची गरज नाही…’, १८ वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतो ‘हा’ अभिनेता
Love Live | रुपेरी पडद्यावर अनेक गुन्हे करून अभिनेत्याने मिळवली ओळख, पत्नीच्या निधनानंतर १८ वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत राहतोय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये, कोण आहे तो अभिनेता? झगमगत्या विश्वात अनेक सेलिब्रिटी आहेत, जे लग्न न करता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत...

मुंबई : 27 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे लग्न न करता जोडीदारासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. लग्न न करता एकत्र राहत असल्यामुळे अनेकांनी सेलिब्रिटींवर निशाणा साधला. पण सेलिब्रिटी फक्त आणि फक्त त्यांच्या भावनांना आणि जोडीदाराला महत्त्व देताना दिसले. एवढंच नाही तर, काही सेलिब्रिटी घटस्फोटानंतर त्यांच्या बॉयफ्रेंड / गर्लफ्रेंडसोबत राहत आहेत. पण बॉलिवूमध्ये असा एक सेलिब्रिटी आहे, ज्याने पत्नीच्या निधनानंतर १८ वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. जेव्हा अभिनेत्याने सर्वांसमोर नात्याची कबुली तेव्हा तो तुफान चर्चेत आहे.
सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता राहुल देव आहे. आज राहुल देव याचा आज वाढदिवस असल्यामुळे त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. बॉलिवूडचा खलनायक राहुल देव कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो..
रुपेरी पडद्यावर अनेक गुन्हे करून अभिनेत्याने मिळवली ओळख
राहुल देव यांनी २००० साली ‘चॅम्पियन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. या सिनेमा राहुल अभिनेते सनी देओल आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्या सोबत दिसला होता. राहुल देवने सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली. राहुल याने साकारलेल्या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक झालं. त्यानंतर राहुल याने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि अभिनेता यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला.




प्रोफेशनल आयुष्यात अभिनेता यशाच्या शिखरावर पोहोचला. पण राहुल याच्या खासगी आयुष्यात अनेक चढ – उतार आले. राहुल याची पत्नी रीना देव हिचं २००९ मध्ये कर्करोगामुळे निधन झालं. तेव्हा अभिनेता पूर्णपणे खचला होता. तेव्हा ११ वर्षांच्या मुलाची पूर्ण जबाबदारी अभिनेत्यावर आली.. पण हळू – हळू दुःखातून अभिनेत्याने स्वतःला सावरलं.
१८ वर्ष लहान गर्लफ्रेंडमुळे आला चर्चेत…
पत्नीच्या निधनानंतर अभिनेता पूर्णपणे एकटा पडला होता. तेव्हा राहुल याच्या आयुष्यात अभिनेत्री मुग्धा गोडसे हिची एन्ट्री झाली. मुग्धा आणि राहुल यांच्या वयात तब्बल १८ वर्षांचं अंतर आहेत. पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं कालांतराने प्रेमात रुपांतर झालं. २०१५ मध्ये दोघांनी सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केला.
आजही दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. अद्यापही दोघांनी लग्न केलेलं नाही. ‘आम्हाला लग्नाची गरज नाही… कारण आम्ही आमच्या आयुष्यात आनंदी आहोत…’ असं वक्तव्य राहुल देव आणि मुग्धा गोडसे यांनी केलं होतं. आज दोघे त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत.