शाहरुख खानमुळे वाढतायेत गरिबी सारख्या समस्या? कायद्याच्या कचाट्यात किंग खान, काय आहे प्रकरण?
Shah Rukh Khan: मुलांवर वाईट प्रभाव, कॅन्सर आणि गरिबी सारख्या समस्या वाढण्याचं कारण आहे शाहरुख खान? किंग खानला कोर्टाकडून नोटीस जारी, नक्की काय आहे प्रकरण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खानची चर्चा

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह, किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याला आद कोणत्याच ओळखीची गरज नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुख खानने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील आहे. कायम अभिनेत्याची कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चा होत असते. पण आता अभिनेता कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे.
रिपोर्टनुसार, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी रायपूर कोर्टाने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला नोटीस बजावली आहे. याबाबत एका तरुणाने तक्रार दाखल केली आहे. आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावणारा शाहरुख खान अनेक ब्रँड्सचा ॲम्बेसेडरहीआहे. त्याने क्रीम्ससह अनेक लोकप्रिय जाहिरातीही केल्या आहेत.




शाहरुख खान याने चित्रित केलेल्या जाहिरातींचा मुलांवर वाईट प्रभाव पडत असल्याचा आरोप न्यायालयाने केला आहे. फेअर अँड हँडसम, विमल पान मसाला, रम्मी यांसारख्या जाहिराती समाजात संभ्रम पसरवत आहेत… असं देखील कोर्टाचं म्हणणं आहे.
View this post on Instagram
फैजान खान नावाच्या व्यक्तीने शाहरुख खान याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शाहरुख खानसारख्या सेलिब्रिटींच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे कॅन्सर आणि गरिबीसारख्या समस्या वाढत आहेत तसेच समाजावर नकारात्मक परिणाम होत आहे, ज्याचा थेट परिणाम मुलांवर होत असल्याचा आरोप वकील फैजान खान यांनी केला आहे.
याप्रकरणी शाहरुख खानसह अन्य कंपन्यांवर देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये गूगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ॲमेझॉन इंडिया, नेटफ्लिक्स इंडिया, एम्स लिमिटेड, आईटीसी लिमिटेड आणि हेड डिजिटल वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड (A23 Rummy) यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 29 मार्च रोजी रायपूर कोर्टने शाहरुख खानकडून नोटिसीवर उत्तर मागितलं आहे.
शाहरुख खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे. ‘किंग’ सिनेमात शाहरुख खान पहिल्यांदा लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.