बॉलिवूड सोडून राजकारणात एन्ट्री करणारा अभिनेता म्हणतो, ‘मैं घर का रहा ना घाट का..’

खरंच राजकारणात प्रवेश केल्यानंतर असं होतं? बॉलिवूड सोडल्यानंतर 'या' अभिनेत्याने धरला राजकारणाचा मार्ग, राजकारणी व्यक्तींबद्दल अभिनेता सर्वांसमोर म्हणाला...

बॉलिवूड सोडून राजकारणात एन्ट्री करणारा अभिनेता म्हणतो, 'मैं घर का रहा ना घाट का..'
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 11:04 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप चाहत्यांवर सोडल्यानंतर काही सेलिब्रिटींनी झगमगत्या विश्वाला राम राम ठोकत राजकारणाच्या दिशेने स्वतःचा मोर्चा वळवला. बॉलिवूडमध्ये स्थान भक्कम केल्यानंतर कलाकार राजकारणात देखील उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. बॉलिवूड सोडल्यानंतर राजकारणाचा मार्ग धरणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे राज बब्बर. नुकताच राज बब्बर यांनी तीन मुलांसोबत विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. राज बब्बर यांच्या मुलाचं नाव प्रतीक बब्बर असून दोन मुलींचं नाव आर्या बब्बर आणि जूही बब्बर आहे. मुलांसोबत कपिलच्या शोमध्ये राज बब्बर यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

द कपिल शर्मा शोचा एक प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राज बद्दर यांना कपिल अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे. कपिल, राज बब्बर यांना विचारतो, ‘तुमच्यासोबत असं कधी झालंय, निर्मात्यांनी तुमचे पैसे दिले नाहीत, पण जेव्हा तुम्ही राजकारणात प्रवेश केला, तेव्हा ते स्वतःच तुमचे पैसे घवून आले…’

हे सुद्धा वाचा

कपिलने असा प्रश्न विचारल्यानंतर राज बब्बर म्हणाले, ‘मी जेव्हा सामाजिक कार्यात सहभाग घेतला, तेव्हा ज्यांनी मला पैसे द्यायला हवे होते, त्यांनी देखील मला पैसे देणं बंद केलं. त्यांना असं वाटलं राज यांना आता पैशांची काय गरज आहे.’ असं राज बब्बर म्हणाले.

राजकारणी व्यक्तींबद्दल राज बब्बर म्हणाले, ‘राजकारणाची प्रतिमा फार वाईट आहे. राजकारणात प्रवेश केला म्हणजे तुमच्याकडे १०० – ५०० कोटी रुपयाची संपत्ती आहे… असा समज होतो. माझं काय झालं आहे? ‘मैं घर का रहा ना घाट का..’ अशा विनोदी अंदाजात राज बब्बर यांनी राजकारणाबद्दल आपली भूमिका मांडली.

राजकारणाला राम राम ठोकल्यानंतर राज बब्बर यांनी राजकारणाचा मार्ग धरला. आता राज बद्दल काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. राज बब्बर यांनी अनेक सिनेमांमध्ये काम काम केलं. ‘आप जैसा कोई नहीं’, ‘इन्सानियत के दुष्मन’, ‘इन्साफ का तराजू’, ‘उमराव जान’, ‘औलाद के दुष्मन’, ‘काल्का’, ‘जीने नहीं दूंगा’, ‘दौलत’, ‘निकाह’, ‘बॉडीगार्ड’, ‘माटी मांगे खून’, ‘सौ दिन सास के’ सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत झळकले.

राज बब्बर यांच्या शिवाय बॉलिवूड सोडून अभिनेते परेश रावल, जया बच्चन, रेखा, उर्मिला मातोंडकर यांसारख्या अनेक कलाकारांनी राजकारणाचा मार्ग धरला. एका काळ असा होता जेव्हा या सेलिब्रिटींनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.