‘मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी…’, राज ठाकरे यांचं लतादीदींना विनम्र अभिवादन

६ फेब्रुवारी २०२२ मध्ये लतादीदी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि एका पर्वाचा अंत झाला, दीदींच्या आठवणीत राज ठाकरे भावुक...

'मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी...', राज ठाकरे यांचं लतादीदींना विनम्र अभिवादन
'मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी...', राज ठाकरे यांचं लतादीदींना विनम्र अभिवादन
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 11:37 AM

Lata Mangeshkar Death Anniversary : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर म्हणजेच आपल्या लतादीदी यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं. पण तरी देखील दीदी आपल्यामध्ये आजही आहेत… अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. लतादीदी यांनी कायम संगीतावर प्रेम केलं आणि त्यांच्या गाण्यातून, आवाजातून इतरांना प्रेम करायला शिकवलं. आज अनेकांच्या प्रेरणास्थानी दीदी आहे. दीदीच्या आठवणीत आज प्रत्येक भारतीय जगत आहे. ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये लतादीदी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि एका पर्वाचा अंत झाला. त्यांच्या निधनाला वर्ष झालेल्यानंतर अनेकजण दीदींच्या आठवणीत भावुक झाले आहेत. (lata mangeshkar last song)

लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील ट्विटरवर एक पोस्ट करत दीदींना अभिवादन केलं आहे. पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी एक दीदींचा एक फोटो देखील पोस्ट केला. फोटो पोस्ट करत राज ठाकरे यांनी लता दीदींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…. असं म्हटलं आहे. (lata mangeshkar sister)

शिवाय राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये दीदींच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. ‘मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरुपातील दीदी कायम राहणार आहेत.’ भावना व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले… ‘दीदींच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील…’ सध्या राज ठाकरे यांची पोस्ट सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. (lata mangeshkar total songs)

भारतीय संगीतविश्वात लतादीदी यांचं योगदान अत्यंत मोलाचं. संगीत कलाकार म्हणून त्यांनी अनेक गाणी गायली. लतादीदी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये केली. दीदींनी ९०० पेक्षा अधिक हिंदी सिनेमांमध्ये गाणी गायली.

आज दीदी आपल्या नसल्यातरी त्यांच्या आठवणी मात्र कायम आपल्यासोबत असतील. कारण एका कलाकाराचं निधन कधीच होत नाही. कलाकाराची कला कायम जिवंत असते. लतादीदी देखील त्यांच्या संगीताच्या माध्यमातून प्रत्येत भारतीयाच्या मनात आहेत.

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ सली मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर शहरात दीनानाथ मंगेशकर यांच्या घरात झाला होता. लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर यांच्या सर्वात मोठ्या कन्या होत्या. लतादीदी यांच्यानंतर मीना, आशा आणि उषा यांचा जन्म झाला. त्यानंतर भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म झाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.