अभिनेत्याची संपत्ती ऐकून पत्नी हैराण, जिने आयुष्यभर साथ दिली तिला एकही रुपया न देता कोट्यवधींची संपत्ती दिली कोणाला?

पती मोजत होता शेवटच्या घटका, प्रसिद्ध अभिनेत्याची गडगंज संपत्ती जाणून पत्नी हैराण, पण अभिनेत्याने पत्नीला का नाही दिला संपत्तीतील वाटा... कोणमध्ये वाटली कोट्यवधींची संपत्ती?

अभिनेत्याची संपत्ती ऐकून पत्नी हैराण, जिने आयुष्यभर साथ दिली तिला एकही रुपया न देता कोट्यवधींची संपत्ती दिली कोणाला?
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 11:57 AM

मुंबई | झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटींच्या आयुष्यातील कोडी कधी न सुटण्यासारखी असतात. बॉलिवूडमध्ये अनेक नव्या कलाकारांनी पदार्पण केलं… स्वतःची ओळख निर्माण केली… यशाच्या उच्च शिखरावर चढत असताना अनेक चढ – उतार आले. पण कायम करियरला प्राधान्य देत सेलिब्रिटींनी पुढचा मार्ग निवडला. आता देखील अशाच प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटीची चर्चा रंगत आहे. सध्या ज्या सेलिब्रिटीची चर्चा रंगत आहे, ते प्रसिद्ध अभिनेते आज जिवंत नसले तरी, त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से आजही चाहत्यांना जाणून घ्यायचे असतात. तरुण वयात एका अभिनेत्रीवर झालेलं प्रेम… सात वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये घालवलेला तो काळ… त्यानंतर ब्रेकपअ… अखेर १६ वर्षीय अभिनेत्रीसोबत लग्न… अशा अनेक घटनांमुळे ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली ते होते अभिनेते राजेश खन्ना…

हिंदी सिनेमांचे पहिले सुपरस्टार… असंख्य मुली ज्यांच्या प्रेमात वेड्या होत्या, अशा राजेश खन्ना यांच्या मनावर मात्र अभिनेत्री अंजू महेंद्रू यांचं राज्य होतं. एक दोन नाही तर, तब्बल सात वर्ष दोघे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिले. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखरे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अंजू महेंद्रू यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी १६ वर्षीय अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया दोन मुलींचे आई – बाबा झाले. दोन मुलींच्या जन्मानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया वैवाहिक आयुष्यात आनंदी नव्हते. शेवटी राजेश खान्ना यांनी शेवटच्या घटका मोजत असताना संप्ततीची वाटणी केली. पण पत्नी डिंपल कपाडिया यांना एक रुपया देखील दिला नाही.

एक काळ होता जेव्हा राजेश खन्ना यांच्यापुढे प्रत्येक अभिनेता फिका होता. पण वेळेनुसार सर्व काही बदलतं… हे वाक्य राजेश खन्ना यांच्या आयुष्यात खरं ठरलं. बॉलिवूडमध्ये राजेश खन्ना यांची लोकप्रियता कमी होवू लागली आणि त्यांची जागा महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतली. पण आजपर्यंत बॉलिवूडमध्ये बिग बींना कोणी हरवू शकलेलं नाही.

अमिताभ बच्चन यांचा काळ सुरु झाल्यामुळे राजेश खन्ना यांच्या आयुष्यात अपयश आलं. अशात वैवाहिक आयुष्यात सतत येणाऱ्या चढ – उतारामुळे डिंपल कपाडिया देखील दोन मुलींना घेवून वेगळ्या झाल्या. नात्यात आणि करियरमध्ये देखील अपयश आल्यामुळे राजेश खन्ना पूर्णपणे खचले.

एवढंच नाही तर, राजेश खान्ना कायम डिप्रेशनमध्ये राहू लागले. २०११ मध्ये राजेश खन्ना यांची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टरांनी राजेश खन्ना यांना कर्करोग झाल्याचं निदान केलं. राजेश खन्ना यांच्यावर उपचार तर झाले. पण वाईट काळात कुटुंबसोबत नसल्यामुळे राजेश खन्ना खचले.

यासिर उस्मानच्या ‘कुछ तो लोग कहेंगे’ या पुस्तकात एका गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. पत्नी डिंपल यांनी पती राजेश खन्ना यांच्याकडून काहीही नको होतं. त्या म्हणाल्या, ‘मला काही नको, तुम्हाला जे द्यायचे आहे ते मुलींना द्या…’, असं त्या म्हणाल्या होत्या. राजेश खन्ना यांनी देखील तसंच केलं.

पत्नीला एकही रुपया न देता कोट्यवधी संपत्तीची वाटणी अभिनेत्याने दोन मुलींमध्ये केली. पण शेवटच्या क्षणी दोन्ही मुली म्हणजे ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना सोबत असाव्यात हिच राजेश खन्ना यांची शेवटची इच्छा होती.

संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.