Shahid Kapoor | शाहिद कपूरने ४ वर्षांच्या सावत्र भावाचं तोंडही पाहिलं नाही; राजेश खट्टर यांच्याकडून मोठा खुलासा

शाहिद कपूर याच्या सावत्र वडिलांकडून मोठा खुलासा, अभिनेत्याने अद्याप चार वर्षांच्या भावाचं तोंड देखील पाहिलं नाही, कारण..., सध्या सर्वत्र शाहिद याच्या सावत्र भावाची चर्चा..

Shahid Kapoor | शाहिद कपूरने ४  वर्षांच्या सावत्र भावाचं तोंडही पाहिलं नाही; राजेश खट्टर यांच्याकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 9:52 AM

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहिद कायम त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतित करत असतो. शाहिद कपूर हा नीलिमा अझीम आणि पंकज कपूर यांचा मुलगा आहे. पण शाहिद याच्या आई – वडिलांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर नीलिमा यांनी राजेश खट्टर यांच्यासोबत लग्न केलं. पण ११ वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजेश खट्टर यांनी २००८ साली वंदना सजनानी यांच्यासोबत लग्न केला. दोघांना एक मुलगा आहे. त्यांच्या मुलाचं नाव युवान खट्टर असं आहे. शाहिद कपूर हा राजेश खट्टर यांचा सावत्र मुलगा आहे..

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राजेश खट्टर यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. नीलिमा आणि राजेश यांची पहिली भेट दिल्ली येथे झाली होती. भेटीचं रुपांतर प्रेमात झालं, त्यानंतर दोघांनी लग्न केलं. नीलिमा आणि राजेश यांना एक मुलगा आहे. त्यांच्या मुलाचं नाव ईशान खट्टर असं आहे. यावेळी राजेश खट्टर यांनी ईशान आणि शाहिद यांच्या नात्याबद्दल देखील मोठा खुलासा केला.

राजेश खट्ट म्हणाला, ‘ईशान कायम युवान याला भेटत असतो. पण शाहिद याने अद्याप ४ वर्षीय भावाचा तोंडही पाहिला नाही. जेव्हा नीलिमा सोबत घटस्फोट झाला तेव्हा ईशान फक्त ५ वर्षांचा होता आणि आमच्या घटस्फोटाचा त्याच्यावर परिणाम झाला होता.’ ईशान आणि शाहिद सावत्र भाऊ असले तरी त्यांच्यातील नातं फार खास आहे..

शाहिद याच्याबद्दल राजेश खट्टर म्हणाले, ‘आमचं एक सामान्य आयु्ष्य होतं.. ११ वर्ष आम्ही एकत्र होतो. शाहिद मला कदाचित चांगला वडील मानत असेल. जेव्हा आम्ही भेटतो, तेव्हा एकत्र व्यतीत केलेल्या क्षणांच्या आठवणी ताज्या करतो. शाहिद प्रचंड प्रेमळ आहे.’ पुढे शाहिद कपूर याच्या यशात तुमचं काही योगदान आहे का? असा प्रश्न राजेश खट्टर यांना विचारण्यात आला..

या प्रश्नाचं उत्तर देताना राजेश खट्टर म्हणाला, ‘सर्वकाही शाहिदवर अवलंबून आहे. जर यामध्ये मी माझी भूमिका पाहिली तर, मला असं वाटतं, मी मुंबईत आलो नसतो तर कधी नीलिमा आणि शाहिद माझ्या आयुष्यात आले नसते. असं राजेश खट्टर म्हणाले..

शाहिद याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता त्याच्या कुटुंबासोबत आज प्रचंड आनंदी आहे. शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत देखील कायम चर्चेत आहे. शाहिद आणि मीरा यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.. शाहिदच्या कुटुंबाचे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या.
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर.
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?.
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?.