ऐश्वर्याचा संसार अखेर मोडलाच, कायद्याच्या कचाट्यात अडकलं नातं
Divorce | झगमगत्या विश्वातील आणखी एक घटस्फोट... ऐश्वर्या हिचा संसार अखेर मोडलाच..., कोर्टात दाखल केला घटस्फोटासाठी अर्ज... चाहत्यांसाठी देखील मोठा धक्का... अनेक वर्ष सुखी संसार केल्यानंतर जोडप्याने घेतला घटस्फोटाचा निर्णय... चर्चांना उधाण...
झगमगत्या विश्वात ब्रेकअप आणि घटस्फोटाच्या कायम बातम्या समोर येत असतात. पण ज्या जोडप्याने एकेकाळी चाहत्यांना कपल गोल्स दिले असतील अशा जोडप्यांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. आता अभिनय विश्वातील सुरपस्टार रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या आणि अभिनेत धनुष यांच्या घटस्फोटाची माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, 2022 मध्ये ऐश्वर्या – धनुष यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. पण दोघे मुलांसाठी एकत्र आल्याची माहिती देखील समोर आली होती.
पण दोन वर्षांनंतर पुन्हा ऐश्वर्या – धनुष यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या आणि धनुष यांनी अलीकडेच चेन्नईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. ऐश्वर्या आणि धनुष यांनी परपस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून या प्रकरणी काही दिवसांत सुनावणी करण्यात येणार आहे.
🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण यावर ऐश्वर्या – धनुष यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, रजनीकांत यांनी देखील ऐश्वर्या आणि धनुष यांचा संसार टिकवण्याचा प्रयत्न केला. पण दोघांमधील मतभेद कमी झाले नाहीत.
2022 मध्ये दोघांनी केली होती घटस्फोटाची घोषणा
धनुषने ट्विटरवर अत्यंत छोटी पोस्ट लिहून घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. 18 वर्षाची सोबत. मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही एक ग्रोथ, समजदारी आणि सहजीवनाचा प्रवास केला होता. आज आम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वत:चा शोध घेऊ. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या प्रायव्हसीची कदर करून आम्हाला त्याच्याशी डील करू द्या, अशी भावूक पोस्ट धनुषने लिहिली होती…
ऐश्वर्या आणि धनुष यांचं लग्न
ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुष आणि ऐश्वर्याचा 2004 मध्ये विवाह झाला होता. त्यांना यात्रा आणि लिंगा नावाची दोन मुले आहेत. धनुष कायम दोन मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असतो. घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर अनेकदा दोघांना मुलांसाठी एकत्र येताना चाहत्यांनी पाहिलं आहे.