Rajinikanth | ठरलं! 31 डिसेंबरला रजनीकांत राजकीय पक्षाची घोषणा करणार, नव्या वर्षात नवी सुरुवात…

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) येत्या नवीन वर्षात राजकीय कारकिर्दीची दमदार नवी सुरुवात करणार आहेत.

Rajinikanth | ठरलं! 31 डिसेंबरला रजनीकांत राजकीय पक्षाची घोषणा करणार, नव्या वर्षात नवी सुरुवात...
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 1:02 PM

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) येत्या नवीन वर्षात राजकीय कारकिर्दीची दमदार नवी सुरुवात करणार आहेत. या वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबरला राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार का?, असा प्रश्न सगळ्याच चाहत्यांच्या मनात घोळत होता. अखेर त्यांनी आज (3 डिसेंबर) या संदर्भात ट्विटरद्वारे त्यांनी माहिती दिली आहे (Rajinikanth going to launch political party in January).

(Rajinikanth going to launch political party in January)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर तमिळनाडूच्या (Tamil Nadu) राजकारणात निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांची सक्रियता वाढली आहे. पुढच्या वर्षी ‘थलायवा’ रजनीकांत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का?, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला होता. सोमवारी (30 नोव्हेंबर) अभिनेता रजनीकांत यांनी त्यांच्या ‘रजनी मक्कल मंद्रम’ या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर ते आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

राजकीय प्रवेशाचा संकेत

तमिळनाडूमधील पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी सुपरस्टार रजनीकांत राजकारणाच्या रिंगणात प्रवेश करण्याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्यामध्येच रजनीकांत विधानसभा निवडणुका लढवू शकतात, असे संकेत त्यांच्या निवेदनाद्वारे देण्यात आले होते. रजनीकांत यांच्या या बैठकीवर तामिळनाडूतील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. या बैठकीनंतर रजनीकांत विधानसभा निवडणुका लढवणार की, नाही हे निश्चित होईल, असे म्हटले जात होते (Rajinikanth going to launch political party in January).

नव्या वर्षाची दमदार सुरुवात…

पुढच्या वर्षी, अर्थात 2021मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत रजनीकांत आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रजनीकांत यांनी महत्त्वाच्या बैठकीसंदर्भात आपले निवेदन जारी केले होते. यात म्हटले होते की, ‘ते आधी रजनी मक्कल मंद्रमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढविणार की नाही याचा निर्णय घेतील.’

राजकारणात सक्रिय

गेली दोन वर्षे रजनीकांत राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतपणे त्यांनी अद्याप राजकारणात प्रवेश केलेला नाही. मात्र, त्यांचे सहकलाकार कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये युती होऊ शकते, असे मानले जात आहे (Rajinikanth going to launch political party in January).

रजनीकांत यांना आरोग्याविषयी काळजी?

रजनीकांत यांची किडनीची स्थिती खराब असल्याने डॉक्‍टरांनी रजनीकांत यांना दगदग, धावपळ आणि दीर्घ प्रवास न करण्याचा सल्ला होता. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर प्रवास करणे धोकादायक असल्याचे सांगितले होते. कोरोनाची लस हाच कोरोनावरील एकमेव उपाय आहे. ती येईपर्यंत कोरोनाचा धोका कायम असेल. रजनीकांत यांचे शरीर कोरोना सहन करु शकेल की नाही याविषयी डॉक्टरांनी काळजी व्यक्त केली होती.

दरम्यान, मागील 2 वर्षांपासून रजनीकांत अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर पुढाकार घेऊन बोलले आहेत. मात्र, चित्रपटसृष्टीतील त्यांचे सहकारी कमल हसन यांच्या तुलनेत त्यांचा औपचारिक राजकीय प्रवेशाला मात्र बराच उशीर झाला आहे. दुसरीकडे अभिनेता कमल हसन यांच्या ‘मक्कल नीधी मैयाम’ पक्षाने मागील लोकसभा निवडणुकीतही आपले उमेदवार उतरवले होते.

(Rajinikanth going to launch political party in January)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.