Rajinikanth | असा नट होणे नाही! रजनीकांत यांच्या ‘त्या’ व्हिडीओवर चाहते फिदा
रजनीकांत हे लवकरच 'लाल सलाम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांची मुलगीच या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. मात्र यामध्ये रजनीकांत यांची मुख्य भूमिका नसून ते पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांना कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाही. त्यांचे चित्रपट जरी लार्जर दॅन लाइफ असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते अत्यंत साधेपणानं राहतात. रजनीकांत यांच्या अभिनयाचे आणि स्टाइलचे बरेच चाहते आहेत. पण त्यांचा साधेपणा आणि सहज वावर चाहत्यांना खूप भावतो. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांना अत्यंत साधा अंदाज पहायला मिळतोय. याच अंदाजावर चाहते पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. रजनीकांत यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
रजनीकांत हे नुकतेच मुंबई विमानतळावर पोहोचले आहेत. आगामी ‘लाल सलाम’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते मुंबईत आले आहेत. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतचा हा चित्रपट आहे. एअरपोर्टवरून बाहेर येताना पापाराझींनी त्यांचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. याच व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. रजनीकांत यांनी साधा निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी रंगाची पँट घातली होती. या व्हिडीओत ते पापाराझींना पाहून हसताना आणि त्यांना अभिवादन करताना दिसत आहेत.
रजनीकांत यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘डाऊन टू अर्थ’, असं एकाने लिहिलंय. तर ‘महागडी कार नाही, कसला अहंकार नाही. त्यांचा साधेपणाच त्यांना सुपरस्टार बनवतो’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘वयाच्या 72 व्या वर्षीही चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि उत्साह कौतुकास्पद आहे’, असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे. रजनीकांत हे लवकरच ‘लाल सलाम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांची मुलगीच या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. मात्र यामध्ये रजनीकांत यांची मुख्य भूमिका नसून ते पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
रजनीकांत यांच्याबद्दल लोकांमध्ये इतकी क्रेझ आहे की, ते दक्षिणेत अनेकजण त्यांना ‘देव’ मानतात. शिवाजी राव गायकवाड असं त्यांचं मूळ नाव आहे. रजनीकांत पाच वर्षांचे असताना त्यांची आई जिजाबाई यांचं निधन झाल होतं. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी सुरुवातीला कुली म्हणूनही काम केलं. त्यानंतर ते बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करू लागले होते.