AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Rajeev Khandelwal | एकता कपूरच्या मालिकेतून राजीव खंडेलवालला मिळाली होती प्रसिद्धी, #MeTooमुळे देखील आला होता चर्चेत!

प्रसिद्ध अभिनेता राजीव खंडेलवाल (Rajeev Khandelwal) 16 ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 1975 साली जयपूर येथे झाला. छोट्या पडद्याव्यतिरिक्त, राजीव खंडेलवाल यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Happy Birthday Rajeev Khandelwal | एकता कपूरच्या मालिकेतून राजीव खंडेलवालला मिळाली होती प्रसिद्धी, #MeTooमुळे देखील आला होता चर्चेत!
Rajeev Khandelwal
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 9:44 AM

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता राजीव खंडेलवाल (Rajeev Khandelwal) 16 ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 1975 साली जयपूर येथे झाला. छोट्या पडद्याव्यतिरिक्त, राजीव खंडेलवाल यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने, आम्ही तुम्हाला राजीव खंडेलवालशी संबंधित खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत…

राजीव खंडेलवाल यांचे वडील भारतीय लष्करात कर्नल होते. राजीव तीन भावांमध्ये सर्वात लहान आहे. त्यांनी आपले शालेय शिक्षण जयपूरमधूनच केले. तेथे त्यांनी हैदराबादमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. राजीव खंडेलवाल यांनी मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने बऱ्याच जाहिरातींसाठी एक मॉडेल म्हणून दीर्घकाळ काम केले. त्याचबरोबर अभिनेता म्हणून राजीवला प्रथम खलनायकाची भूमिका मिळाली होती.

‘या’ मालिकेतून मिळाली ओळख

राजीव खंडेलवाल पहिल्यांदा टीव्ही सीरियल ‘क्या हादसा क्या हकीकत’ मध्ये दिसला होता. ही मालिका 2002 साली आली होती. या मालिकेत राजीव खंडेलवालने खलनायकाची भूमिका साकारली होती, पण त्याला खरी ओळख एकता कपूरच्या मालिका ‘कहीं तो होगा’ मधून मिळाली. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री आमना शरीफ मुख्य भूमिकेत होती. बराच काळ टीव्ही मालिकांमध्ये काम केल्यानंतर राजीव खंडेलवाल यांनी चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला.

MeeToo किस्सा सांगताना म्हणाला…

राजीव खंडेलवालचा पहिला चित्रपट ‘आमिर’ आहे. हा चित्रपट 2008 मध्ये आला. त्यानंतर तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला. राजीव खंडेलवाल यांनी MeToo हॅशटॅग अंतर्गत त्यांच्या जीवनाशी संबंधित एक घटना सांगितली होती. त्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, एका दिग्दर्शकाने त्याला त्याच्या होम ऑफिसमध्ये चित्रपटावर चर्चा करण्यासाठी बोलावले. पुढच्या वेळी दिग्दर्शकाने ऑफिसऐवजी त्याच्या खोलीत बोलावले. जिथे त्याने राजीव खंडेलवालला बसण्यास सांगितले, पण चित्रपटाची कथा सांगण्यास नकार दिला.

राजीव खंडेलवाल म्हणाले, ‘दिग्दर्शकाने मला विचारले की तो एक गाणे ऐकू शकतो आणि ठरवू शकतो की, त्याला चित्रपट करायचा आहे की नाही? दुसऱ्या बैठकीपर्यंत मला समजले होते की, गोष्टी योग्य नाहीत. गोष्टीही थोड्या विचित्र झाल्या आहेत. त्यावेळी माझ्या लक्षात आले होते की, जर माझ्या जागी मुलगी असेल तर तिला कसे वाटले असते. दिग्दर्शकाने मला त्याच्या खोलीत जाण्यास सांगितले, जिथे जाण्यास मी नकार दिला. मी त्याला सांगितले की, माझी मैत्रीण वाट पाहत आहे जेणेकरून त्याला समजेल की मी सरळ आहे.

यानंतर त्या दिग्दर्शकाने मला धमकी दिली की, तू टीव्हीमध्ये काम करणारा नवीन माणूस आहेस आणि मला नकार देत आहेस? जरी नंतर त्याच दिग्दर्शकाने मला दोन चित्रपटांची ऑफर दिली, पण मी नकार दिला. राजीव म्हणाला की, आयुष्यात आपण अशा सर्व प्रकारच्या लोकांना भेटू ज्यांच्यापासून आपल्याला दूर राहावे लागेल.

हेही वाचा :

Akshay Gorkha Look : आता अक्षय कुमार दिसणार ‘गोरखा’मध्ये, पोस्टर प्रदर्शित करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

Utkarsh Sharma : 20 वर्षांत प्रचंड बदलला गदरचा जीत, ‘गदर 2’मध्ये उत्कर्ष शर्मा दाखवणार पूर्वीसारखा जलवा?

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.