राजू श्रीवास्तव यांच्या निधनाचं खरं कारण समोर; लेकीकडून सत्य उघड
सर्वांना पोट धरुन हसवणारे विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. निधनाआधी रुग्णालयात उपचार सुरु अलेल्या राजू यांच्या निधनाचं खरं कारण लेकीने अखेर सांगितलं.
मुंबई : सर्वांना पोट धरुन हसवणारे विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. निधनाआधी अनेक दिवस राजू रुग्णालयात मृत्यूला झुंज देत होते. पण त्यांचा ही झुंज अपयशी ठरली आणि गेल्यावर्षी राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला. अखेर अनेक दिवसांनंतर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाचं खरं कारण समोर आलं आहे. राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तव हिने वडिलांच्या मृत्यूचं कारण सांगितलं आहे. अंतराने शेवटच्या क्षणी वडिलांसोबत झालेल्या संवादाबद्दल सांगितलं आहे.
एका मुलाखतीत अंतरा श्रीवास्तव म्हणाली, ‘आईने जेव्हा फोनवर बाबा एम्स रुग्णालयात दाखल असल्याचं सांगितलं तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता.’ अंतरा म्हणाली, राजू श्रीवास्तव आजारी होते. वडिलांच्या मृत्यूसाठी जीम जबाबदार नसल्याचं देखील अंतराने सांगितलं. राजू श्रीवास्तव यांनी अनेक आरोग्य समस्या होत्या.
पुढे अंतरा म्हणाली, ‘जेव्हा त्यांना हृदय विकाराचा झटका आला तेव्हा ते जीममध्ये होते. त्यांना अस्वस्थ वाटत होतं. या घडलेल्या गोष्टींमधून आपण शिकलं पाहिजे काही आरोग्य समस्या असतील, तर वेळेत उपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. असं देखील अंतरा श्रीवास्तव म्हणाली.
अंतराच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने अनेक सिनेमांमध्ये असिस्ट केलं आहे. ‘वोदका डायरीज’मध्ये अंतराने सहाय्यक निर्माती म्हणून काम केलं आहे. शिवाय अंतराने अभिनेत्री कल्की केक्ला आणि श्रेयस तळपदे यांच्यासोबत लघुचित्रपटात काम देखील केलं आहे. सध्या अंतरा एका वेब शोमध्ये काम करत आहे.
राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांना ताबडतोबत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं डॉक्टरांनी त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवलं.
राजू श्रीवास्तव यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र 42 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बुधवारी सकाळी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. 22 सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.