Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप देताना पत्नीला अश्रू अनावर; चाहते शोकाकुल

शिखा श्रीवास्तव हमसून हमसून रडल्या; राजू यांना दिला अंतिम निरोप

Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप देताना पत्नीला अश्रू अनावर; चाहते शोकाकुल
Raju and Shikha SrivastavaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 2:24 PM

असं म्हटलं जातं की पती-पत्नीचं नातं हे सात जन्मांचं नातं असतं. या प्रवासात जोडीदाराने साथ सोडली, तर त्यापेक्षा मोठं दु:ख असूच शकत नाही. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी शिखा श्रीवास्तव (Shikha Srivastava) सध्या याच दु:खाचा सामना करत आहेत. राजू यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. काल (बुधवार) सकाळी राजू यांनी अखेरचा श्वास घेतला. आत दुपारी 12 च्या वाजताच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजू यांना अखेरचा निरोप (Last Rites) देताना शिखा हमसून हमसून रडल्या.

राजू यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पूर्णपणे खचल्या आहेत. त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शिखा यांच्या चेहऱ्यावर पतीला गमावल्याचं अतीव दु:ख स्पष्ट दिसत आहे. हृदय पिळवटून टाकणारा त्यांचा हा फोटो आहे.

राजू यांच्या निधनावर बोलताना पत्नी शिखा म्हणाल्या, “मी सध्या व्यक्तच होऊ शकत नाही. मी काय बोलू हेच मला कळत नाहीये. त्यांनी खूप संघर्ष केला. मी खरोखरच आशा करत होते आणि त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. पण असं झालं नाही. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आशा सोडली नव्हती. मी एवढंच म्हणेन की ते खरे लढवय्ये होते.”

हे सुद्धा वाचा

राजू श्रीवास्तव यांचं त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम होतं. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशी या दोघांची प्रेमकहाणी आहे. शिखा यांचं हृदय जिंकण्यासाठी राजू यांनी तब्बल 12 वर्षे प्रतीक्षा केली होती. राजू यांनी त्यांच्या भावाच्या लग्नात शिखा यांना पहिल्यांदा पाहिलं होतं आणि पाहताच क्षणी ते प्रेमात पडले होते.

मात्र शिखा यांना लग्नासाठी विचारणा करण्याआधी त्यांना आपल्या पायावर उभं राहायचं होतं. त्यासाठी ते मुंबईत आले आणि कॉमेडी विश्वास आपलं स्थान निर्माण केलं. 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी शिखा यांना लग्नासाठी विचारलं. 1993 मध्ये त्यांनी शिखासोबत लग्न केलं. राजू आणि शिखा यांना अंतरा आणि आयुष्मान ही दोन मुलं आहेत.

राजू श्रीवास्तव यांना आज दिल्लीतील निगमबोध घाटावर अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी शिखा या रडत रडत त्याठिकाणी पोहोचल्या होत्या. राजू यांच्या कुटुंबीयांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.