AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृतिकचं सहावं बोट कापायचं होतं, पण… या कारणामुळे राकेश रोशन यांनी बदलला निर्णय

अभिनेता हृतिक रोशनने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा त्याची बरीच चर्चा झाली होती. 'कहो ना प्यार है' हा त्याचा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. यातील त्याचा लूक, अभिनय, डान्स या सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यासोबतच हृतिकच्या आणखी एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं होतं.

हृतिकचं सहावं बोट कापायचं होतं, पण... या कारणामुळे राकेश रोशन यांनी बदलला निर्णय
ऋतिक रोशन हा सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षाही अधिक त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नुकताच ऋतिक रोशन हा भारतामध्ये परतला आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ऋतिक रोशन हा सबा आझाद हिच्यासोबत विदेशात गेला. Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 3:12 PM

मुंबई : 20 नोव्हेंबर 2023 | बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन केवळ देशभरातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. त्याच्या डान्स आणि अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. हृतिकची आणखी एक अशी गोष्ट आहे, जी त्याला इतरांपेक्षा थोडं वेगळं ठरवते. ही गोष्ट म्हणजे हृतिकच्या उजव्या हाताला असलेली सहा बोटं. हृतिकने 2000 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तेव्हा पहिल्यांदा त्याच्या हातावरील सहा बोटं प्रेक्षकांना दिसून आली होती. त्यावरून बरीच चर्चासुद्धा झाली. हृतिकच्या याच सहा बोटांमुळे त्याचे वडील राकेश रोशन चिंतेत होते आणि ते सहावं बोट ऑपरेशन करून कापण्याच्या विचारात होते.

हृतिकच्या करिअरमधील पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ तुफान गाजला होता. हृतिकच्या वडिलांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. मात्र मुलाच्या हातावरील सहा बोटांमुळे ते बऱ्याचदा चिंतेत असायचे. यामुळे हृतिकला कोणी सहज स्वीकारणार नाही, अशी भीती त्यांना होती. म्हणून त्यांनी ऑपरेशनने ते सहावं बोट कापण्याचा विचार केला होता. मात्र राकेश रोशन यांची पत्नी आणि हृतिकची आई पिंकी रोशन यांनी त्याला विरोध केला. हृतिकची ही सहा बोटं म्हणजे देवाचा विशेष आशीर्वाद आहे. त्यामुळे ते काढून टाकणं योग्य नाही, असं त्या म्हणाल्या. एका मुलाखतीत खुद्द हृतिकने ही गोष्ट मान्य केली होती की सहा बोटांमुळे अनेकदा त्याची खिल्ली उडवली गेली.

हे सुद्धा वाचा

हृतिकच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, तो अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. हृतिक आणि सबा आझादच्या वयात जवळपास 12 वर्षांचं अंतर आहे. हृतिकच्या कुटुंबीयांशीही तिची जवळीक वाढली आहे. दिवाळीच्या निमित्ताने हृतिकने खास त्याच्या कुटुंबीयांसोबतचा फोटो पोस्ट केला होता. यामध्ये सबासुद्धा दिसली होती. हृतिक आणि सबाची पहिल्यांदा ओळख ही ट्विटरवर झाल्याचं म्हटलं जातं. हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले आणि दोघांचा संवाद सुरू झाला.

वयाची पंचेचाळिशी ओलांडल्यानंतरही हृतिक आजही तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. त्याने जेव्हा इंडस्ट्रीत पदार्पण केलं, तेव्हा तरुणी अक्षरश: त्याच्यामागे वेड्या झाल्या होत्या. कहो ना प्यार है हा त्याच्या करिअरमधील पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता आणि या चित्रपटानंतर त्याला लग्नासाठी तब्बल 30 हजार मुलींच्या मागण्या आल्या होत्या

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.