Rakhi Sawant | राखी सावंतच्या जवळची व्यक्ती तुरुंगातून करतेय तिला जीवे मारण्याचा प्लॅन? अभिनेत्रीचा दावा

राखीने आदिलवर फसवणुकीचा, मारहाण केल्याचा आणि पैसे बळकावल्याचा आरोप केला होता. तिच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलविरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. 

Rakhi Sawant | राखी सावंतच्या जवळची व्यक्ती तुरुंगातून करतेय तिला जीवे मारण्याचा प्लॅन? अभिनेत्रीचा दावा
राखी सावंतच्या चालकाला अटकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 1:04 PM

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत तिच्या लग्नामुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत होती. आदिल खान दुर्रानीशी लग्न केल्यानंतर काही महिन्यांनीच तिने त्याच्यावर गंभीर आरोप केले. सध्या आदिल तुरुंगात असून त्याच्यावर राखीने पुन्हा एकदा आरोप केले आहेत. आदिलने मला जीवे मारण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिल्याचा खुलासा राखीने केला आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आदिलबद्दल बोलताना दिसतेय.

“शत्रूंपासून वाचण्यासाठी मी सध्या दुआं वाचतेय. मला आताच समजलंय की आदिलने तुरुंगातून एका व्यक्तीला मला मारण्यासाठी सुपारी दिली आहे. मला आदिलला इतकंच सांगायचं आहे की मी दुआं वाचली आहे आणि अल्लाह माझी प्रार्थना स्वीकारेल यावर मला विश्वास आहे. तू मला मारू शकत नाही. तुला असं का करायचं आहे? माझ्या प्रॉपर्टीसाठी आणि सू़ड घेण्यासाठी”, असा सवाल तिने या व्हिडीओतून केला आहे.

यानंतर राखीने एक व्हॉइस रेकॉर्डिंगसुद्धा ऐकवला आहे. यामध्ये राखीचा शुभचिंतक तिला आदिलच्या प्लॅनविषयी सांगतोय. “मला तुझ्याबद्दल ही माहिती मिळाली आहे आणि मला ती तुला सांगायची आहे. मी माझी ओळख जाहीर करू शकत नाही, पण मी तुझा शुभचिंतक आहे. आदिलच्या रुममध्ये काही लोकं होती. त्याने तुला मारण्यासाठी काही लोकांसोबत डील केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्लॅनिंग सुरू आहे. तो इथल्या सर्व पोलिसांनाही विकत घ्यायला तयार आहे”, असं त्या रेकॉर्डिंगमध्ये ऐकायला मिळतंय.

हे सुद्धा वाचा

या रेकॉर्डिंगनंतर राखी पुढे म्हणते, “मी रमजानमध्ये जेव्हा रोझा उपवास केला, तेव्हाच मी त्याला माफ केलं होतं. त्याने माझ्या आईला मारलंय, माझी फसवणूक केली आहे आणि माझे पैसेसुद्धा घेतले आहेत. तरीसुद्धा मी त्याला माफ केलं. आता सर्व गोष्टी मी अल्लाहवर सोपवल्या आहेत. तो खरंच मला मारण्याचा प्रयत्न करतोय का?” यावर आपल्याकडे पुरावेही असल्याचं ती व्यक्ती सांगते.

राखीने आदिलवर फसवणुकीचा, मारहाण केल्याचा आणि पैसे बळकावल्याचा आरोप केला होता. तिच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलविरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.