Rakhi Sawant | राखी सावंतच्या आयुष्यात पुन्हा फुटली प्रेमाची पालवी, आता नवा गडी नवं धनी

राखी सावंत ही कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत असते. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच पती आदिल दुर्रानी याच्यावर काही गंभीर आरोप केले. राखी सावंत हिच्या आरोपांनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आदिल दुर्रानी याच्या लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा राखी हिने केला.

Rakhi Sawant | राखी सावंतच्या आयुष्यात पुन्हा फुटली प्रेमाची पालवी, आता नवा गडी नवं धनी
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 9:57 PM

मुंबई : राखी सावंत हे नेहमीच चर्चेत असलेले एक नाव आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) हिने काही महिन्यांपूर्वीच आदिल दुर्रानी नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले. विशेष म्हणजे राखी सावंत हिने आदिल दुर्रानी यांच्यासोबतच्या लग्नाची गोष्ट बरीच महिने सर्वांपासून लपवून ठेवली. बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर थेट सर्वांना मोठा धक्का देत आदिल दुर्रानी (Adil Durrani) याच्यासोबतच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपण लग्न केल्याचे जाहिर केले. आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न (Marriage) करताना राखी सावंत हिने इस्लाम धर्म देखील स्वीकार केला. लग्नानंतर आपले नाव फातिमा आदिल दुर्रानी असल्याचे राखी हिने जाहिर केले.

लग्नानंतर काही दिवस राखी सावंत ही आनंदामध्ये दिसली. मात्र, त्यानंतर आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करताना राखी दिसली. यांचे प्रकरण थेट कोर्टात गेले. आता सध्या आदिल दुर्रानी हा जेलमध्ये आहे. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर केलेल्या आरोपांनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आदिल दुर्रानीबद्दल अनेक खुलासे राखीने केले आहेत.

नुकताच राखी सावंत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत हिने मोठा दावा केलाय. राखी सावंत थेट म्हणाली की, माझे आता दुबई बरोबर एक खास नाते तयार झाले आहे. मी दुबईमध्ये एक हाॅटेल आणि एक क्लब सुरू केला आहे. ते पैसे दुबईच्याच लोकांचे आहेत, मी काय खूप श्रीमंत नाहीये.

पुढे राखी सावंत हिने म्हटले की, मला दुबईमध्ये एक खास व्यक्ती भेटलाय. मी एकटी काय काय करू मला एका जीवनसाथीची खूप जास्त गरज आहे. स्टेशन व्यवस्थित आहे, बाकी काय ट्रेन येत जात राहतीलच. म्हणजे आता आदिल दुर्रानी याच्यानंतर राखी सावंत हिच्या आयुष्यात दुसरा कोणीतरी व्यक्ती आल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

पुढे राखी म्हणाली की, माझा आदिल दुर्रानी याच्यासोबत घटस्फोट घेणे बाकी आहे. मी दुबईला असताना त्याचे मला सतत फोन येत होते की, मला जेलबाहेर काढ. पण मी त्याला म्हटले की, ही माझी केस नाहीये. मला पण वाटत आहे की, आदिल दुर्रानी हा लवकर बाहेर यावा. कारण मला त्याच्यासोबत घटस्फोट घ्यायचा आहे. सुरूवातीला आदिल दुर्रानी याच्यासोबत घटस्फोट घेणार नसल्याचे सांगताना राखी दिसली होती.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.