कंगनाने सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा तो म्हणाला होता… : राखी सावंत

कंगनाने अभिनेता सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सलमान बोलला, चल हट गंदी, चल निकल, असा दावा अभिनेत्री राखी सावंतने केला आहे

कंगनाने सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा तो म्हणाला होता... : राखी सावंत
Follow us
| Updated on: Sep 06, 2020 | 11:24 AM

मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतवर टीकेची झोड उठली आहे. राजकीय क्षेत्रापासून मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही कंगनाला चांगलीच समज दिली. अशातच ‘ड्रामाक्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत हिनेही कंगनावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. (Rakhi Sawant lashes out at Actress Kangana Ranaut)

राखी सावंतने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत कंगनावर घणाघात केला आहे. “कंगना, तुझी एक अत्यंत वाईट सवय आहे. जेव्हा कोणी तुझं ऐकत नाही, तेव्हा तू बडबड करायला लागतेस. हा असा आहे, तो तसा आहे. तू विवाहित पुरुषांच्या आयुष्यात जातेस, मग तो हृतिक रोशन असो किंवा आदित्य पांचोली, हजार माणसं तुझ्या आयुष्यात आली. तू त्यांचं घर बरबाद करते आणि म्हणतेस की यांनी माझ्यासोबत असं केलं” असा आरोप राखी सावंतने केला.

“महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करु नकोस. सुशांतच्या मृत्यूचा फायदा घेऊन पब्लिसिटी घेण्याचा प्रयत्न करु नकोस. कंगनाने अभिनेता सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सलमान बोलला, चल हट गंदी, चल निकल. मोठेमोठ्या स्टार्सच्या आयुष्यात तिने जायचा प्रयत्न केला, मी त्या स्टार्सचे नाव घेऊ शकत नाही” असं राखी म्हणते.

“मला सुशांतच्या निधनाचे दुःख आहे. तो माझाही मित्र होता. पण याचा अर्थ कंगना जे बोलेल, त्यावर देशाच्या जनतेने विश्वास ठेवावा, असा होत नाही. कंगना, तू हे विसरु नकोस की या महाराष्ट्रात सगळ्यांची स्वप्ने पूर्ण होतात. सुशांतसाठी तू पाऊल उचललेस ठीक आहे, पण मराठी माणसांना काही बोललीस, एक-एक मराठी माणसाशी जर तू पंगा घेशील, तर तुला महाराष्ट्रात राहणे अवघड होईल, तुला महाराष्ट्रात शूटिंग करणे अवघड होईल. “अगं ए भवाने, आमचं डोकं फिरलं ना, आता माझी सटकली तर, तू गेलीस, समज, भवाने” असा इशारा राखीने दिला.

पहा व्हिडीओ :

(Rakhi Sawant lashes out at Actress Kangana Ranaut)
View this post on Instagram

#shivshena? #maharashtra #kangnaranaut #bollywood #filmcommunity #bjp #pm#uddhavthackeray #sanjayraut #shivsenacomms #rautsanjay61 #beinghuman #salmaankhan #ritikroshan #srk

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

संबंधित बातम्या :

मुंबईनं मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, मुंबई माझी कर्मभूमी, कंगनाला उपरती

भल्या पहाटे धाड टाकून सॅम्युएल मिरांडाला उचललं, रियाच्या घरी पोहोचलेला NCB चा अधिकारी मराठी अभिनेत्रीचा पती

(Rakhi Sawant lashes out at Actress Kangana Ranaut)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.