‘काळवीट मारलं तेव्हा लॉरेन्स बिष्णोई 5 वर्षांचा..’; सलमानला धमकी देण्याबद्दल राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत
लॉरेन्स बिष्णोई आणि सलमान खान हे प्रकरण ताजं असतानाच आता निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी काही ट्विट्स केले आहेत. या ट्विट्समध्ये त्यांनी लॉरेन्स बिष्णोई आणि सरकारचीही खिल्ली उडवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचं नाव माधम्यांमध्ये तुफान चर्चेत आहे. एका फेसबुक पोस्टद्वारे बिष्णोई गँगने सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी याप्रकरणी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर काही ट्विट्स केले आहेत. या ट्विट्समध्ये त्यांनी स्वत:चा एक वेगळा व्हर्जन मांडला आहे.
राम गोपाल वर्मा यांचं ट्विट-
‘गुंड बनलेल्या एका वकीलाला एका सुपरस्टारला मारून काळवीटच्या मृत्यूचा सूड घ्यायचा आहे. चेतावणी म्हणून त्याने फेसबुकद्वारे गोळा केलेल्या 700 जणांच्या टोळीतून काही लोकांना एका मोठ्या राजकारण्याच्या हत्येचा आदेश दिला, जो स्टारचा जवळचा मित्र आहे. पोलीस त्याला पकडू शकत नाहीत कारण तो जेलमध्ये सरकारच्या संरक्षणाखाली आहे आणि त्याचा प्रवक्ता परदेशातून बोलतोय. जर एखाद्या बॉलिवूड लेखकाने अशी कथा लिहिली तर ते त्याला सर्वांत हास्यास्पद आणि विश्वास न ठेवण्याजोगी कथा लिहिल्याबद्दल फटकारतील,’ असं त्यांनी लिहिलंय.
या ट्विटमध्ये त्यांनी पुढे म्हटलंय, ‘1998 मध्ये जेव्हा काळवीट मारलं गेलं तेव्हा लॉरेन्स बिष्णोई फक्त पाच वर्षांचा मुलगा होता. त्याने 25 वर्षे आपला राग कायम ठेवला आणि आता वयाच्या 30 व्या वर्षी तो म्हणतोय की त्या काळवीटच्या हत्येचा बदला घेण्यसाठी सलमानला मारणं हे त्याच्या जीवनाचं ध्येय आहे. प्राण्यांप्रती असलेलं हे प्रेम अत्युच्च शिखरावर पोहोचलंय की देव विचित्र विनोदाचा खेळ खेळतोय?’
LAWRENCE BISHNOI was just a 5 YEAR OLD KID when the deer was killed in 1998 and Bishnoi maintained his grudge for 25 years and now at age 30 he says that his LIFE’S GOAL is to kill SALMAN to take REVENGE for KILLING that DEER .. Is this ANIMAL love at its PEAK or GOD playing a… https://t.co/KGiOSojxfT
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) October 14, 2024
आणखी काही ट्विट्समध्ये त्यांनी सलमानला बिष्णोईला रोखठोक उत्तर देण्याचा सल्ला दिला आहे. ‘जर एखादा चित्रपट सर्वांत मोठ्या गँगस्टरवर आधारित असेल, तर कोणताही चित्रपट निर्माता दाऊद इब्राहिम किंवा छोटा राजनसारख्या दिसणाऱ्या माणसाला कास्ट करणार नाही. पण इथे मला एकही फिल्म स्टार माहीत नाही जो बी पेक्षा (बिष्णोई) जास्त चांगला दिसत असेल. माझी इच्छा आहे की सलमान खानने बी याला (बिष्णोई) प्रतिवाद धमकी द्यावी. अन्यथा तो टायगर स्टारचा भ्याडपणा वाटेल. बी च्या (बिष्णोई) तुलनेत सर्वांत मोठा सुपरहिरो म्हणून एसकेनं (सलमान खान) वर यावं,’ असं त्यांनी लिहिलंय.
If a film is based on the BIGGEST GANGSTER , no film maker will cast a guy who looks like DAWOOD IBRAHIM or CHOTA RAJAN ..But here , I don’t know a single FILM STAR who is more GOOD LOOKING than B pic.twitter.com/jbZubaTtzY
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) October 15, 2024
सलमान खानशी संबंधित काळवीट शिकार प्रकरण 1998 मध्ये राजस्थानमध्ये ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगदरम्यान घडलं होतं. या घटनेनंतर बिष्णोई समाजाने तीव्र संताप व्यक्त केला होता. या घटनेच्या दोन दशकांनंतर 31 वर्षीय लॉरेन्स बिष्णोईने सलमानविरोधात आपली तीव्र नाराजी सर्वांसमोर जाहीर केली. 2018 मध्ये जोधपूरमधील एका न्यायालयात बिष्णोईने म्हटलं होतं, “आम्ही सलमान खानला मारून टाकू. एकदा का आम्ही कारवाई केली की सर्वांना समजून येईल.” तेव्हापासून बिष्णोईकडून सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.