जावेद अख्तर म्हणाले, आरएसएस, व्हीएचपी आणि बजरंग दल तालिबानसारखेच, भाजपकडून माफीची मागणी
बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंद दल (Bajrang Dal) अफगाणिस्तानमधील तालिबान (Taliban) सारख्याच कट्टरतावादी संघटना असल्याचा आरोप केला. यानंतर भाजप नेते राम कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंद दल (Bajrang Dal) अफगाणिस्तानमधील तालिबान (Taliban) सारख्याच कट्टरतावादी संघटना असल्याचा आरोप केला. यानंतर भाजप नेते राम कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. राम कदम यांनी आपल्या समर्थकांसह थेट जावेद अख्तर यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केलंय. तसेच अख्तर यांनी आपलं विधान मागे घ्याव आणि हात जोडून माफी मागावी, अशी मागणी राम कदम यांनी केलीय.
राम कदम यांनी याआधी या मुद्द्यावर एक ट्विट केलं होतं. त्या त्यांनी म्हटलं, “जावेद अख्तर यांनी आपलं विधान मागे घ्यावं आणि जोडून माफी मागावी. जावेद अख्तर जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या कोट्यावधी कार्यकर्त्यांची माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांच्या कुटुंबातील कुणाचाही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.”
#संघ तथा #विश्वहिंदूपरिषद के करोडों कार्यकर्ताओ की, जब तक हाथ जोड़कर #जावेदअख्तर माफी नही मांगते. तब तक उनकी तथा उनके परिवार की कोई भी #फिल्म इस #माभारती के भूमि पर नहीं चलेगी. pic.twitter.com/ahWgVQWuvH
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) September 4, 2021
“वक्तव्यं मागे घ्यावं, अन्यथा कायदेशीर कारवाई करु”
राम कदम यांच्या आधी भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी देखील जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती. जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये जाऊन तालिबानविरोधात वक्तव्य करुन दाखवावं. याशिवाय भातखळकर यांनी जावेद अख्तर यांनी आपलं वक्तव्यं मागे घ्यावं, अन्यथा कायदेशीर कारवाई करु, असा इशारा दिलाय.
जावेद अख्तर नेमकं काय म्हणाले?
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, “भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंद दल (Bajrang Dal) अफगाणिस्तानमधील तालिबान (Taliban) सारख्याच कट्टरतावादी संघटना आहेत. या संघटनांच्या मार्गात भारताचं संविधान अडसर ठरत आहे. यांना थोडीशी जरी संधी मिळाली तर हे कोणताही संकोच बाळगणार नाहीत. भारतात अल्पसंख्यांक समाजासोबत झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटना म्हणजे तालिबानसारखं बननण्याआधीची रंगीत तालिम आहे. हे सर्व लोक एकच प्रकारचे आहेत. यांची केवळ नावं वेगळी आहेत.”
It is shocking that two members of Muslim personal law board have express their extreme happiness at the take over of AFG by the Barbarian Talibans Although the board has distanced it self but it is not enough.MSLB must give their POV in the most unambiguous words.we are waiting
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) August 24, 2021
‘मुस्लिमांना मारहाण पूर्णपणे पूर्ण तालिबानी होण्यासाठीची ड्रेस रिहर्सल’
एनडीटीव्हीशी संभाषण करताना जावेद अख्तर, ज्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता ताब्यात घेण्यास नाखूष असलेल्या भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गावर टीका केली. ते म्हणाले की, राईट विंग जगात एक आहे. भारतातील अल्पसंख्यांकांच्या मॉब लिंचिंगच्या काही घटनांवर अख्तर म्हणाले, ‘पूर्ण तालिबान बनण्याची ही एक प्रकारची पूर्ण ड्रेस रिहर्सल आहे. ते तालिबानी युक्तीचा अवलंब करत आहेत. ते एकच लोक आहेत, फक्त नाव वेगळे आहे. भारतीय राज्यघटना त्यांचे ध्येय आणि त्यांच्यामध्ये येत आहे, परंतु जर संधी दिली तर ते ही सीमा ओलांडतील.’
आरएसएस आणि तालिबानमध्ये फरक कुठे आहे?
जावेद अख्तर म्हणाले, ‘मला वाटते जे आरएसएस, विहिंप, बजरंग दल यासारख्या संघटनांना समर्थन देतात, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तालिबान अर्थातच मध्ययुगीन मानसिकता आहेत, यात शंका नाही, ते रानटी आहेत पण तुम्ही समर्थन देत असलेल्यांपेक्षा ते वेगळे कुठे आहेत? त्यांची बाजू मजबूत होत आहे आणि ते त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहेत. त्यांची मानसिकता सारखीच आहे.’
“जामियात हा एक मदरसा आहे. त्यांच्या मते विनयभंग, बलात्कार, सर्व प्रकारचे लैंगिक अत्याचार मुलं आणि मुली एकत्र शिकल्यानं होतात. त्याची मतं जुनाट आहेत आणि त्यांना मुस्लीम समुदायाला सल्ले देण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांच कुणीही ऐकत नाही. सध्याच्या काळात बहुतांश मुस्लीम आपल्या मुलांना शिकवू इच्छितात. त्यांना आपल्या मुलांना केवळ चांगल्या शाळेत घालायचं आहे. त्यांच्यासाठी मुलांची किंवा मुलींची वेगळी शाळा महत्त्वाची नाही. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानं इथले काही मुस्लीम नेते किंवा मुस्लीम लॉ बोर्डचे सदस्य मुलींच्या वेगळ्या शाळांची मागणी करत आहेत. मात्र, त्यांच कुणीही ऐकणार नाही. ते केवळ चर्चेत येण्यासाठी अशी विधानं करत आहेत,” असंही जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा :
‘जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन अतिरेक्यांसोबत राहावं’, चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे! अफगाणिस्तान प्रकरणावर संतापले जावेद अख्तर आणि शबाना आझमी
राहुल गांधींना ‘पंतप्रधानपदी’ पाहणं म्हणजे मोदींना ‘पंतप्रधान’ म्हणून कायम करणं; जावेद अख्तरांचा टोला
व्हिडीओ पाहा :
Ram Kadam and BJP activist protest in front of Javed Akhtar hous in Mumbai for remark over RSS