Ram Mandir | टीव्हीचे राम – सीता, लक्ष्मण प्रेक्षकांना देणार खास भेट, अरुण गोविल यांची घोषणा

Ram Mandir | 'हमारे राम आए हैं...', टीव्हीच्या राम-सीता आणि लक्ष्मण यांची 22 जानेवारीसाठी जय्यत तयाररी, प्रेक्षकांना देणार 'ही' खास भेट, अरुण गोविल यांची घोषणा... संपूर्ण भारतात भक्तीमय वातावरण... अयोध्या याठिकाणी पोहोतचे आहेत अनेक सेलिब्रिटी...

Ram Mandir | टीव्हीचे राम - सीता, लक्ष्मण प्रेक्षकांना देणार खास भेट, अरुण गोविल यांची घोषणा
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 11:02 AM

Ayodhya Ram Mandir : अयोध्या याठिकाणी प्रभू राम यांची राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या दिवसासाठी अयोध्यानगरी सजून तयार झाली आहे. तो ऐतिहासिक क्षण जवळ येतोय, ज्याची बऱ्याच वर्षांपासून प्रतिक्षा होती. देश राममय झाला आहे. 22 जानेवारीचा दिवस उत्सवासारखा साजरा करण्याची तयारी आहे. 22 जानेवारी या दिवसाचा साक्षीदार होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखील अयोध्या याठिकाणी पोहोचणार आहेत. संपूर्ण देशात सर्वत्र फक्त आणि फक्त 22 जानेवारी या दिवसाची प्रतीक्षा आणि चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, ‘रामायण’ मालिकेतील राम – सीता, लक्ष्मण अयोध्या याठिकाणी पोहोचले आहेत. अयोध्या नगरीत त्यांचं मोठ्या थाटात स्वागत देखील करण्यात आलं.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे 22 जानेवारीला ‘रामायण’ मालिकेतील राम – सीता, लक्ष्मण प्रेक्षकांना खास भेट देणार आहेत. नुकताच, अभिनेते अरुण गोविल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, लवकरच ‘हमारा राम आये हैं’ हे गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. अरुण गोविल यांनी नव्या गाण्याची घोषणा केल्यानंतर चाहते देखील गाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

हे सुद्धा वाचा

गायक सोनू निगम यांच्या आवाजात प्रदर्शित होणार गाणं

अरुण गोविल ट्विट करत म्हणाले, ‘चला प्रभू राम – सीता आणि लक्ष्मण यांचं अयोध्यामध्ये स्वागत करु. सोनू निगम यांच्या आवाजातील गाणं ‘हमारे राम आए हैं’ प्रदर्शित होणार आहे… हे गाणं 22 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे..’ गाण्यात अरुण गोविल, सुनील लहरी आणि दीपिका चिखलिया दिसणार आहेत… सध्या सर्वत्र नव्या गाण्याची चर्चा रंगली आहे.

राम नगरी पोहोचले टीव्हीचे राम – सीता, लक्ष्मण

अरुण गोविल, सुनील लहरी आणि दीपिका चिखलिया हे राम नगरीत पोहोचले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला. सोशल मीडियावर राम मंदीर आणि अयोध्या नगरीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चाहते देखील व्हिडीओ लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

या सेलिब्रिटींना निमंत्रण मिळालं

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. महानायक अमिताभ बच्चन, अजय देवगण, अक्षय कुमार, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या दिवसाचे साक्षीदार होणार आहेत. या यादीत रजनीकांत, केजीएफ स्टार यश, धनुष, प्रभास, राम चरण यांसारख्या मोठ्या नावांचा देखील समावेश आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात 4000 साधू-संतांसह देशातील सुमारे 7000 पाहुण्यांनाही सोहळ्यासाठी आमंत्रण मिळालं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.