AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्न पूर्ण झालं पण.. अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी गेलेले ‘रामायणा’तील राम नाराज

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 'रामायण' या मालिकेतील मुख्य कलाकार दोन दिवस आधीपासूनच पोहोचले होते. मात्र तरीही रामलल्लाचं दर्शन न झाल्याने मालिकेत रामाची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्वप्न पूर्ण झालं पण.. अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी गेलेले 'रामायणा'तील राम नाराज
Arun GovilImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 10:14 AM

मुंबई : 24 जानेवारी 2024 | रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल हे रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला गेले होते. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या दोन दिवस आधीच ते अयोध्येला पोहोचले होते. मात्र तिथून परतताना अरुण गोविल खूप निराश झाले आहेत. कारण त्यांना रामलल्लाच्या मूर्तीचं दर्शन घेता आलं नाही. अरुण गोविल यांच्यासोबत ‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया आणि लक्ष्मणाच्या भूमिकेतील अभिनेते सुनील लहरीसुद्धा अयोध्येला गेले होते. याआधी सुनील लहरी यांनी अयोध्येत राहण्यासाठी हॉटेल रुम्स उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता अरुण गोविल यांनी निराशा व्यक्त केली आहे.

‘भारत 24’च्या रिपोर्टनुसार अरुण गोविल यांना राम मंदिराविषयी प्रतिक्रिया विचारली गेली. त्यावर ते म्हणाले, “स्वप्न तर पूर्ण झालंय पण मला दर्शन मिळालं नाही. यावर मी आता काहीच बोलू शकत नाही.” यानंतर एनडी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अरुण गोविल यांनी सांगितलं की ते पुन्हा अयोध्येला जातील आणि तिथे प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेतील. गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतून अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी यांचे व्हिडीओ समोर येत आहेत. या व्हिडीओमध्ये ते तिथल्या चाहत्यांची भेट घेताना, राम मंदिर परिसरात निवांत क्षण व्यतीत करताना दिसले.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Arun Govil (@siyaramkijai)

अयोध्येत अरुण गोविल यांनी रामचरण, चिरंजीवी आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो क्लिक केले. हे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही पोस्ट केले आहेत. याआधी सुनील लहरी यांनी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या आधी सांगितलं होतं की अयोध्येत येऊन दोन दिवस झाले, मात्र राहण्यासाठी अद्याप कोणत्याही हॉटेलचं रुम मिळालं नाही. त्यामुळे मुख्य कार्यक्रमात कसा सहभागी होईन, याविषयी त्यांनी काळजी व्यक्त केली होती. यानंतर ते प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात सहभागी झाल्याचं पहायला मिळालं आणि त्यांनीसुद्धा सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

अयोध्येतील श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी दुपारी 12.29 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभूरामाचं दर्शन घेतलं. भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात कृतकृत्य झाल्याची भावना निर्माण झाली.