Ramesh Deo Death : अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांची प्रेमकहाणी कशी बहरली?

रमेश देव यांनी नायक आणि खलनायकाच्याही भूमिका अगदी सरसपणे साकारल्या. रमेश जेव यांच्या अभिनयाची चर्चा होते तेव्हा त्यांच्या आणि सीमा देव यांच्या प्रेमाचीही चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. तर कशी होती या दोन सच्चा प्रेमींची प्रेमकहाणी पाहूया...

Ramesh Deo Death : अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांची प्रेमकहाणी कशी बहरली?
रमेश देव, सीमा देव
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 11:49 PM

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील देखणे आणि गुणी अभिनेते अशी ओळख असलेले रमेश देव (Ramesh Deo) यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चार दिवसांपूर्वीच 30 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस साजरा झाला आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली. रमेश देव यांच्या निधनानं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रमेश देव यांनी नायक आणि खलनायकाच्याही भूमिका अगदी सरसपणे साकारल्या. रमेश जेव यांच्या अभिनयाची चर्चा होते तेव्हा त्यांच्या आणि सीमा देव (Seema Deo) यांच्या प्रेमाचीही चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. तर कशी होती या दोन सच्चा प्रेमींची प्रेमकहाणी पाहूया…

रमेश देव यांनी 1962 मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ (सीमा देव) यांच्यासोबत लग्न केलं होतं. या दोघांनीही अनेक चित्रपटांत सोबत काम केलं. ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री कायमच चर्चिली गेली. रमेश देव हे त्यांची पत्नी सीमा देव यांच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठे होते. रमेश देव यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1950 मध्ये मराठी चित्रपटापासून केली. पुढे त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले. त्यांनी सुरुवातीला छोटे छोटे भूमिका साकारल्या. पुढे रमेश देव यांना चित्रपटात मुख्य भूमिका मिळत गेल्या. तर हिंदी चित्रपटांत त्यांनी सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. याच वेळी दुसरीकडे सिनेसृष्टीत नलिनी सराफ हे नाव नावारुपाला येत होते. त्यांनी चित्रपटांसाठी आपले नाव सीमा असे ठेवले होते. सीमा देव यांनी 1960 मध्ये जगाच्या पाठीवर या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं. याच चित्रपटात रमेश देव यांनीही भूमिका साकारली होती. या जोडीमुळे जागाच्या पाठीवर हा चित्रपट चांगलाच गाजला. त्यावेळी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

नव्वदीतही रमेश देव पत्नीला भेटवस्तू देत

तब्बल दोन दशके रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केले. 1962 मध्ये त्यांनी वरदक्षिणा या चित्रपटात सोबत काम केले. या चित्रपटावेळीच दोघांचे प्रेम जुळले. नंतर उशीर न करता त्यांनी त्याच वर्षी लग्न केलं. 2013 मध्ये या जोडीच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाले, यावेळीदेखील दोघांमधील प्रेम तेवढेच फुललेले दिसले होते. अजूनही म्हणजे वयाच्या नव्वदीतही रमेश देव आपल्या लाडक्या पत्नीसाठी नवनव्या भेटवस्तू घेत होते. तसेच पत्नीला प्रेमाने त्या भेटवस्तू देतही असतं.

रमेश देव यांच्या अभियनाची सुरुवात

रमेश देव यांनी 1951 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. 1956 साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. राजश्री प्रोडक्शनच्या 1962 साली आलेल्या आरती या सिनेमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं. रमेश देव यांनी जवळपास 180 पेक्षा अधिक अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. अशा या गुणी, देखण्या आणि मराठी चित्रपटसृष्टीचं नाव देशपातळीवर घेऊन जाणाऱ्या अभिनेल्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

इतर बातम्या :

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन! दोन दिवसांपूर्वीच साजरा केला होता 93वा वाढदिवस

घरगुती उपायांनी सोडवा सिगारेटचे व्यसन, हे रामबाण उपाय वाचा, व्यसनमुक्त व्हा

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.