Rana Daggubati: चाहत्याने सेल्फी मागताच राणा डग्गुबतीने फोन हिसकावला अन्..

तिरुपती मंदिरात चाहत्याने राणाकडे मागितला सेल्फी; पुढे काय घडलं ते तुम्हीच पहा..

Rana Daggubati: चाहत्याने सेल्फी मागताच राणा डग्गुबतीने फोन हिसकावला अन्..
Rana DaggubatiImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 2:41 PM

‘बाहुबली’ या सुपरहिट चित्रपटात भल्लाल देवची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती (Rana Daggubati) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. राणा नुकताच पत्नी मिहीका बजाज आणि वडील डी. सुरेश बाबू यांच्यासोबत तिरुपती मंदिरात (Tirupati Temple) देवदर्शनाला पोहोचला होता. या मंदिराबाहेरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमुळेच राणा नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये राणा हा मंदिरातील काही अधिकाऱ्यांसोबत चालताना दिसत आहे. यावेळी तो फोटोग्राफर्सना बाजूने फोटो काढण्याची विनंती करतो. त्याचसोबत तो त्यांना अभिवादन करतानाही दिसतोय.

काही सेकंदांनंतर, एक चाहता राणाकडे धावत येतो आणि त्याच्याकडे सेल्फीची मागणी करतो. तेव्हा राणा त्या चाहत्याचा फोन हिसकावून घेतो आणि काही सेकंदांनंतर तो त्याला परत करतो. नंतर तो हसत चाहत्याला म्हणतो, “मंदिरात सेल्फी घेऊ नका.”

हे सुद्धा वाचा

राणा नुकताच ‘विराटपर्वतम’ या तेलुगू चित्रपटात झळकला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट विशेष कामगिरी करू शकला नाही. तो लवकरच अभिनेते व्यंकटेश यांच्यासोबत एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

व्यंकटेश हे राणाचे काका आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये त्याने ट्विटरवर या प्रोजेक्टची घोषणा केली होती. “आम्ही दोघांनी आतापर्यंतच्या करिअरमध्ये ज्या भूमिका साकारल्या, त्यापेक्षा अत्यंत वेगळ्या भूमिका या चित्रपटात पहायला मिळतील”, असं त्याने म्हटलं होतं.

राणाने दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मात्र ‘बाहुबली’ या चित्रपटातील भल्लाल देवाच्या भूमिकेमुळे त्याला देशभरात भरपूर प्रसिद्धी मिळाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.