AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Kapoor | नव्या वर्षाचा नवा धमाका, रणबीर कपूर चाहत्यांना देणार मोठी गुडन्यूज!

या नवीन वर्षात रणबीर कपूरही मोठा धमाका करणार आहे. रणबीर लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी देणार आहे.

Ranbir Kapoor | नव्या वर्षाचा नवा धमाका, रणबीर कपूर चाहत्यांना देणार मोठी गुडन्यूज!
| Updated on: Dec 31, 2020 | 11:31 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आपल्या कुटुंबासमवेत राजस्थानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याच्या या फॅमिली ट्रीपमध्ये गर्लफ्रेंड आलिया भट्ट आणि तिचे कुटुंबदेखील सामील झाले आहे. एकाकीकडे सगळेच जण नव्या वर्षाच्या आगमनाची वाट बघत आहेत. तर, या नवीन वर्षात रणबीर कपूरही मोठा धमाका करणार आहे. रणबीर लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी देणार आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे त्याचा नवा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात रणबीर ‘कबीर सिंग’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्यासोबत काम करणार आहे. एका व्हिडीओसह या नवीन चित्रपटाची घोषणा होणार आहे. रणबीरने राजस्थानला जाण्यापूर्वी या वृत्ताला दुजोरा दिला होता (Ranbir Kapoor announcing his upcoming movie on new years occasion).

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला, रणबीर आणि संदीप रेड्डी यांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा एका व्हिडिओद्वारे, बरोबर 12:01 मिनिटांनी होणार आहे. या व्हिडीओमधून चित्रपटात कोण कोणते कलाकार असणार आहेत, याचा उलगडा करण्यात येणार आहे. हा नवा चित्रपट रणबीरकडून चाहत्यांना नव्या वर्षाची मोठी भेट असणार आहे. हा व्हिडीओ ‘टी-सीरीज’ या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध होणार आहे.

दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा!

माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, सारा अली खान या चित्रपटात रणबीरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साराच्या बॅक टू बॅक दोन चित्रपटांमध्ये तितकेसे यश दिसून आलेले नाही. रणबीरसोबतचा हा चित्रपट तरी साराला इंडस्ट्रीमध्ये पुन्हा उभे करेल का, हे येणारा काळच ठरवेल. साराच्या नावाची चर्चा असतानाच, इतर काही अहवालानुसार या चित्रपटाच्या निर्मात्यांनी परिणिती चोप्राला मुख्य अभिनेत्री म्हणून निवडल्याचे कळते आहे. रणबीर आणि परिणीतीसमवेत या बिग बजेट चित्रपटात बॉबी देओल आणि अनिल कपूरही दिसणार असल्याची चर्चा आहे (Ranbir Kapoor announcing his upcoming movie on new years occasion).

भूषण कुमार, रणबीर आणि संदीपच्या या आगामी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. दोघेही दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी या दोघांनी शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. रणबीर कपूरचा हा चित्रपट 2021मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

रणबीरच्या चित्रपटांची रांग!

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी ‘शमशेर’चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. रिपोर्ट्सनुसार रणबीर श्रद्धा कपूरसह ‘लव्ह रंजन’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

(Ranbir Kapoor announcing his upcoming movie on new years occasion)

हेही वाचा :

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.