Animal | इंटिमेट सीन शूट करताना तृप्ती डिमरीला कसे प्रश्न विचारायचा रणबीर कपूर? अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

Animal | ‘ॲनिमल’ सिनेमासाठी इंटिमेट सीन शूट करताना कशी होती तृप्ती डिमरी हिची अवस्था? रणबीर अभिनेत्रीला सतत विचारायचा 'असे' प्रश्न? तृप्तीकडून मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘ॲनिमल’ स्टारर रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी हिची चर्चा रंगली आहे.

Animal | इंटिमेट सीन शूट करताना तृप्ती डिमरीला कसे प्रश्न विचारायचा रणबीर कपूर? अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 8:21 AM

मुंबई | 11 डिसेंबर 2023 : ‘ॲनिमल’ (Animal) सिनेमाने प्रदर्शनानंतर फक्त नऊ दिवसांत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी… सिनेमातील प्रत्येक कलाकार गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. पण अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘ॲनिमल’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका रात्रीत तृप्ती हिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिची चर्चा रंगली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तृप्ती हिने शुटिंग दरम्यान काय घडलं… याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

‘ॲनिमल’ सिनेमात रणबीर आणि तृप्ती यांच्यावर इंटिमेट सीन शूट करण्यात आला आहे. सीनवरून अनेक वाद देखील निर्माण झाले. सोशल मीडियावर देखील रणबीर आणि तृप्ती यांच्या इंटिमेट सीनची चर्चा रंगली आहे. इंटिमेट सीन शूट होत असताना रणबीर सतत तृप्ती हिला एक प्रश्न विचारत असायचा.. याचा खुलासा खुद्द तृप्ती हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत केला आहे.

तृप्ती म्हणाली, ‘इंटिमेट सीन शूट होत असताना सेटवर फक्त 5 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. एवढंच नाही तर, प्रत्येक मॉनिटरची स्क्रिन देखील बंद होती.’ पुढे रणबीर याच्याबद्दल तृप्ती म्हणाली, ‘रणबीर सतत माझी विचारपूस करायचा. प्रत्येक पाचव्या मिनिटाला रणबीर म्हणायचा, तू ठिक आहेस ना… तू कंफर्टेबल आहेस ना?..’ सिनेमातील इंटिमेट सीनची सध्या तुफान चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर रणबीर आणि तृप्ती यांचे सीन, फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. याआधी संदीप यांनी ‘कबीर सिंह’ आणि ‘अर्जुन रेड्डी’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.

‘ॲनिमल’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. सिनेमा फक्त भारत देशात नाही तर, जगभरात बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारताना दिसत आहे. सिनेमाने प्रदर्शनानंतर 9 दिवसांत तब्बल 650 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. रिपोर्टनुसार, 9 दिवसांत सिनेमाने जगभरात तब्बल 660 कोटी रुपयांची कमाई केली आहे. येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करतो पाहाणं म्हत्त्वाचं ठरणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.