Ranbir Kapoor | “जे लोक फक्त पैसे कमावण्यासाठी..”; रणबीर कपूरने कोणत्या अभिनेत्यांवर साधला निशाणा?

याविषयी रणबीर पुढे म्हणाला, "मला या इंडस्ट्रीत 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता काम करताना त्यात प्रेम आणि प्रेरणा या दोन्ही गोष्टी असणं महत्त्वाचं वाटतं." सहा महिन्यांच्या या ब्रेकदरम्यान रणबीर त्याच्या पत्नी आणि मुलीला वेळ देणार आहे.

Ranbir Kapoor | जे लोक फक्त पैसे कमावण्यासाठी..; रणबीर कपूरने कोणत्या अभिनेत्यांवर साधला निशाणा?
Ranbir kapoor
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 12:37 PM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर लवकरच ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रणबीर आणि श्रद्धा कपूरची जोडी पहायला मिळणार आहे. प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने त्याचा मोठा निर्णय जाहीर केला. पुढील सहा महिन्यांसाठी ब्रेक घेणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. त्याचसोबत फक्त पैशांसाठी चित्रपटांमध्ये काम करणार नसल्याचंही तो म्हणाला.

‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटानंतर रणबीरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदाना भूमिका साकारणार आहे. ॲनिमलनंतर तो सहा महिन्यांसाठी अभिनयातून ब्रेक घेणार आहे. हा निर्णय रणबीरने नुकताच जाहीर केला. एका मुलाखतीत तो म्हणाला, “मला लवकरच एखादी चांगली कथा पसंत पडावी, अशी मी अपेक्षा करतोय. पण मी हा ब्रेक घेऊन खूप खुश आहे, कारण मला माझ्या मुलीसोबत वेळ घालवायचा आहे. गेल्या काही दिवसांत मला कोणती स्क्रिप्ट फारशी आवडली नाही आणि मला त्या अभिनेत्यांसारखं बनायचं नाही जे फक्त पैसे कमावण्यासाठी काम करतात.”

रणबीरने त्याच्या या वक्तव्यातून कोणत्या अभिनेत्यांवर निशाणा साधला, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. याविषयी रणबीर पुढे म्हणाला, “मला या इंडस्ट्रीत 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता काम करताना त्यात प्रेम आणि प्रेरणा या दोन्ही गोष्टी असणं महत्त्वाचं वाटतं.” सहा महिन्यांच्या या ब्रेकदरम्यान रणबीर त्याच्या पत्नी आणि मुलीला वेळ देणार आहे.

हे सुद्धा वाचा

रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र 2’ या चित्रपटाच्या शूटिंगला वर्षाच्या अखेरपर्यंत सुरुवात होईल. “आम्हाला ब्रह्मास्त्र 2 आणि 3 बनवायचा आहे. अयान मुखर्जी सध्या स्क्रिप्टिंगवर काम करतोय. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षी शूटिंगला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे,” अशी माहिती रणबीरने दिली.

तू झूठी मैं मक्कार हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून त्यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघं पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. यामध्ये डिंपल कपाडियाचीही भूमिका आहे. त्याचसोबत निर्माते बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट असेल. येत्या 8 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.