श्रद्धा कपूसोबत चित्रपटाचं प्रमोशन करण्यास आलियाने दिला नकार? रणबीर कपूरने दिलं उत्तर

यामध्ये डिंपल कपाडियाचीही भूमिका आहे. त्याचसोबत निर्माते बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट असेल.

श्रद्धा कपूसोबत चित्रपटाचं प्रमोशन करण्यास आलियाने दिला नकार? रणबीर कपूरने दिलं उत्तर
Alia, Ranbir and ShraddhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 12:31 PM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट येत्या 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघं चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे रणबीर आणि श्रद्धा हे प्रमोशनच्यावेळी एकत्र दिसले नाहीत. रणबीर एकीकडे तर श्रद्धा दुसरीकडे या चित्रपटाचं प्रमोशन करतेय. रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचं प्रमोशन ही जोडी अशी वेगवेगळी का करतेय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रणबीरने त्या प्रश्नाचं उत्तर उपरोधिकरित्या दिलं आणि पत्रकाराला कोणतीच अफवा पसरवू नका, अशी विनंती केली.

‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमधील आणि गाण्यांमधील या जोडीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. पण ऑनस्क्रीन दिसणारी ही फ्रेश जोडी असल्याने प्रेक्षकांनी त्यांना थिएटरमध्येच एकत्र पहावं, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. पण आलिया भट्टमुळे हे दोघं एकत्र प्रमोशन करत नाहीये का, अशी शंका चाहत्यांच्या मनात उपस्थित झाली.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाला रणबीर?

“ती का मला थांबवण्याचा प्रयत्न करेल? तुम्ही आलियाबद्दल चुकीची माहिती देऊन इथे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. ती याविषयी काही बोललीसुद्धा नाही. सध्या तरी माझ्या आयुष्यात कोणतंच स्कँडल नाही”, असं रणबीर हसत म्हणाला.

तू झूठी मैं मक्कार हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून त्यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघं पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. यामध्ये डिंपल कपाडियाचीही भूमिका आहे. त्याचसोबत निर्माते बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट असेल. येत्या 8 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.