‘तू झूठी मैं मक्कार’ची जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग; रणबीर-श्रद्धाच्या चित्रपटाची होणार धमाकेदार सुरुवात

तू झूठी मैं मक्कार हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून त्यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघं पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. यामध्ये डिंपल कपाडियाचीही भूमिका आहे.

'तू झूठी मैं मक्कार'ची जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग; रणबीर-श्रद्धाच्या चित्रपटाची होणार धमाकेदार सुरुवात
Ranbir Kapoor, Shraddha KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 10:09 AM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही कलाकार त्यांच्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. प्रदर्शनाच्या चार दिवस आधी या रविवारी (5 मार्च) चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा पाहता रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट दमदार कमाई करणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. असं झाल्यास बॉलिवूडसाठी ही सकारात्मक बाब असेल. कारण शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सोडता बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या कोणत्या चित्रपटाने दमदार कामगिरी केली नाही.

2023 या वर्षांत आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी फक्त ‘पठाण’नेच रेकॉर्डब्रेक कमाई केली. कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ आणि अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली. मात्र ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा हा बॉलिवूडसाठी आशेचा किरण ठरतोय. रविवारी रात्रीपर्यंत या चित्रपटाचे देशभरात जवळपास 30 हजार तिकिटं विकली गेली आहेत. या विक्रीतून जवळपास 1 कोटी रुपये कमाई होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

सध्याचा ट्रेंड पाहता रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट पहिल्या दिवशी जवळपास 15 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. असं झाल्यास हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करणारा पाचवा चित्रपट ठरेल. याआधी पठाण, ब्रह्मास्त्र, सूर्यवंशी आणि भुल भुलैय्या 2 यांसारख्या चित्रपटांनी पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती.

तू झूठी मैं मक्कार हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून त्यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघं पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. यामध्ये डिंपल कपाडियाचीही भूमिका आहे. त्याचसोबत निर्माते बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट असेल. येत्या 8 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.