जेव्हा लग्नात तुमची ‘एक्स’ समोर येते..; रणबीर-कतरिनाच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स
अनंत अंबानीच्या वरातीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एकीकडे रणबीर कपूर-विकी कौशल डान्स करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आलिया भट्ट आणि कतरिना एकमेकींसोबत गॉसिप करताना दिसत आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली. शाहरुख खान, सलमान खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ.. यांसह इतरही कलाकार अनंत-राधिकाच्या लग्नाला उपस्थित होते. या लग्नाच्या वरातीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या वरातीत सेलिब्रिटी हे सर्वसामान्यांप्रमाणेच धमाल नाचत होते. वरातीच्या एका व्हिडीओ नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये एकीकडे अभिनेता रणबीर कपूर आणि विकी कौशल हे दोघं शाहरुख खानसोबत ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे त्यांना पाहून आलिया भट्ट आणि कतरिना कैफ हे एकमेकींसोबत गॉसिप करताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
रणबीर आणि कतरिना हे एकमेकांना डेट करायचे, ही गोष्ट जगजाहीर होती. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. नंतर रणबीरने आलिया भट्टशी लग्न केलं. तर कतरिनाने विकी कौशलशी लग्नगाठ बांधली. आता लग्नात जेव्हा हे दोघं एकमेकांसमोर आले, तेव्हा सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कतरिना आणि आलिया या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे लग्नात या दोघींना एकत्रच पाहिलं गेलं. मात्र रणबीरसुद्धा विकीसोबत थिरकताना दिसल्याने, हे दृश्य पाहणं नेटकऱ्यांसाठी एक वेगळीच पर्वणी होती.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
याआधी अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रणबीर आणि कतरिना एकत्र दिसले होते. त्यावेळी रणबीर आलियासोबत आणि कतरिना विकीसोबत तिथे पोहोचली होती. दोघं एकाच विमानात आणि त्यानंतर एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले होते. इतकंच काय तर रणबीरचा सेल्फी घेतानाचा एक व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाला होता. कारण त्यावेळी त्याच्या मागेच कतरिना बसली होती.
सोशल मीडियावर आणखी फोटो व्हायरल होत असून त्यामध्ये कतरिना कैफ आणि दीपिका पादुकोण या दोघी एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. रणबीरने दीपिका पादुकोणलाही डेट केलं होतं. या दोघांचा ब्रेकअप अत्यंत वाईट पद्धतीने झाला होता. त्यामुळे जेव्हा कतरिना आणि दीपिका एकाच फ्रेममध्ये दिसल्या, तेव्हा नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली.