Ranbir Kapoor | ‘या’ कारणामुळे रणबीर कपूर चित्रपटांमधून घेणार ब्रेक, अभिनेताचा मोठा खुलासा

बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या तूफान चर्चेत आहे. रणबीर कपूर हा मोठे खुलासे करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याला थेट ईडीने समन्स पाठवला आहे. यामुळे रणबीर कपूरच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली.

Ranbir Kapoor | 'या' कारणामुळे रणबीर कपूर चित्रपटांमधून घेणार ब्रेक, अभिनेताचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Oct 25, 2023 | 12:15 PM

मुंबई : रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला अभिनेता आहे. अ‍ॅनिमल हा चित्रपट रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर हा दिसतोय. विशेष म्हणजे रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. यामुळे रणबीर कपूर याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. रणबीर कपूर याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये.

काही दिवसांपूर्वीच थेट रणबीर कपूर याला ईडीने समन्स पाठवला. ज्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये रणबीर कपूर हा काही मोठे खुलासे करताना दिसतोय. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी काही वर्षे एकमेकांना डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रणबीर कपूर याने नुकताच एक अत्यंत मोठा खुलासा केलाय. रणबीर कपूर याने स्पष्ट केले की, तो आता चित्रपटांमधून ब्रेक घेणार आहे. रणबीर कपूर हा सहा महिन्यासाठी ब्रेकवर जाणार आहे. याबद्दल बोलताना रणबीर कपूर हा म्हणाला की, मी पुढील सहा महिने हे फक्त आणि फक्त माझी मुलगी राहा हिला देणार आहे.

अ‍ॅनिमल रिलीज झाल्यानंतर मी सहा महिने राहा हिच्यासोबत राहणार आहे. प्रामाणिकपणे सांगतो की, राहा हिला जन्मानंतर मी फार जास्त काही वेळ देऊ शकलो नाहीये, कारण सतत चित्रपट आणि शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तिला वेळ देणे शक्य झाले नाही. म्हणून पुढील सहा महिने माझे हे राहा हिच्यासाठी असणार आहेत.

पुढे रणबीर कपूर हा म्हणाला की, राहा मस्त धमाल करते. आता ती हळूहळू बोलण्याचा प्रयत्न देखील करत आहे. मा आणि पा हे बोलण्याचा प्रयत्न करतंय. म्हणजेच आता हे स्पष्ट आहे की, पुढील काही महिने रणबीर कपूर हा आपल्या कुटुंबियांना वेळ देणार आहे. रणबीर कपूर हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. रणबीर कपूर याला पापाराझी यांच्यासोबत मस्ती करताना देखील व्हिडीओ तूफान व्हायरल झाला.

मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....