Randhir Kapoor | अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Randhir Kapoor | अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
रणधीर कपूर
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 5:38 PM

मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 74 वर्षीय अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. रुग्णालयाकडून लवकरच अधिकृत हेल्थ अपडेट जाहीर केले जाईल. सध्या रणधीर कपूर आणि त्यांची बहिण रीमा जैन हे राजीव कपूर यांच्या संपत्तीची कायदेशीर लढाई लढत आहेत (Randhir Kapoor tested corona positive admitted in Kokilaben Hospital).

इंडिया टाईम्सच्या अहवालानुसार रुग्णालयातील अधिकाऱ्यांपैकी डॉ. संतोष शेट्टी म्हणाले की, ‘अभिनेता रणधीर कपूर यांना काल रात्री कोरोना उपचारासाठी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.’ अधिक माहिती आणि 74 वर्षीय अभिनेत्याच्या वैद्यकीय बुलेटिनची प्रतीक्षा आहे.

कपूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर

कपूर घराण्यावर गेल्या काही महिन्यांत दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. गेल्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) या जगाला निरोप देऊन निघून गेले आणि अलीकडेच त्यांचे बंधू राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचेही 9 फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. ऋषी आणि राजीव यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ रणधीर कपूर (Randhir Kapoor) अद्याप या धक्क्यातून बाहेर आलेले नाही. कपूर घराण्याच्या या पिढीचे रणधीर कपूर आणि त्याचा बहिण रीमा जैन (Rima Jain) हे दोघेच हयात आहेत. दिवंगत राजीव कपूर यांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी देखील झाली आहे (Randhir Kapoor tested corona positive admitted in Kokilaben Hospital).

भावाच्या मालमत्तेवर केवळ आमचा अधिकार!

रणधीर कपूर आणि रीमा जैन यांचे वकील म्हणाले की, राजीव कपूरच्या मालमत्तेवर फक्त भाऊ-बहीणच हक्क दाखवू शकतात. आमच्याकडे त्यांच्या घटस्फोटाची कागदपत्रे नाहीत. आम्ही ती शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु, ती सापडली नाही. त्यांना घटस्फोटाची कागदपत्रे सादर करण्यापासून सूट देण्यात यावी. यावर न्यायाधीश गौतम म्हणाले की, घटस्फोटाच्या आदेशाची कागदपत्रे सादर न करण्यासाठी सूट देण्यास न्यायालय तयार आहे, परंतु स्वीकृतीपत्र आधी दिले जावे. या प्रकरणातील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

हायकोर्टाने मागितले कागद

सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने मालमत्तेवरील विवाद सोडवण्याच्या सुनावणीदरम्यान राजीव कपूर यांच्या मालमत्तेची आवश्यकता असल्यास त्यांनी राजीव यांच्या घटस्फोटाची कागदपत्र न्यायालयात आणली पाहिजेत, ज्यात राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची ऑर्डर असली पाहिजे.

(Randhir Kapoor tested corona positive admitted in Kokilaben Hospital)

हेही वाचा :

Backwaters : केरळमधील बेपत्ता लहान मुलाच्या रहस्यमय कथेवरील ‘बॅकवॉटर्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जेव्हा ऋषी कपूर जुही चावलाला म्हणाले ‘इन्सिक्युअर’, अभिनेत्रीने शेअर केला जुना किस्सा…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.