Deepika Padukone : लाडक्या लेकीचं नाव काय ठेवणार दीपिका ? आलिया भट्ट-अनुष्का शर्माला फॉलो करणार की…

Deepika Padukone Ranveer Singh Baby Girl : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे आता पॅरेंट्स क्लबमध्ये सामील झाले आहेत. गणशोत्सवाच्या काळातच त्यांना कन्यारत्न झालं. 8 सप्टेंबर रोजी दीपिकाने मुलीला जन्म दिला. लग्नाच्या 6 वर्षांनी या जोडप्याने गुड न्यूज दिली आहे. सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनीही दीपिका-रणवीरला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच दरम्यान आता दीपिकार-रणवीर त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव काय ठेवतात, याची अनेकांना उत्सुकता आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आई-वडिलांचा नवा जोडून आपल्या मुलांचं नाव ठेवलं आहे. हे जोडपंही तोच ट्रेंड फॉलो करणार का ?

Deepika Padukone : लाडक्या लेकीचं नाव काय ठेवणार दीपिका ? आलिया भट्ट-अनुष्का शर्माला फॉलो करणार की...
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 1:17 PM

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी 8 सप्टेंबर रोजी त्यांच्या छोट्या परीचे स्वागत केले. दोघांनी जीवनाच्या नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या नव्या पाहुण्यामुळे अतिशय आनंदित झालेले दीपिका-रणवीर हे त्यांच्या बाळाच्या आगमनामुळे तितकेच उत्सुक आहेत. त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. एवढंच नव्हे तर या जोडप्याच्या लाखो चाहत्यांनी देखील त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या लाडक्या लेकीला आशीर्वादही दिलेत. हे दोघं त्यांच्या मुलीची पहिली झलक कधी शेअर करतात, यासाठीही चाहते खूप उत्सुक आहेत , मात्र त्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. जेव्हापासून दीपिका-रणवीरने ही गुड न्यूज दिली आहे, तेव्हापासूनच अनेकांनी त्या दोघांना सोशल मीडियावर टॅग करत शुभेच्छा दिल्या, तसेच लाडक्या लेकीचं नाव काय ठेवणार असा प्रश्नही अनेक जण विचारत आहेत. तर काही लोकांनी त्यांच्या मुलीसाठी थोडी वेगळी, अनोखी नावंही सुचवली आहेत.

गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधील सेलिब्रिटी एक वेगळा ट्रेंड फॉलो करत आहेत. ज्यामध्ये त्या सेलिब्रिटी आई-वडिलांच्या नावातील काही अक्षर जोडून त्यांच्या मुलांचं नाव ठेवण्यात येतं. अभिनेत्री अनुष्का शर्मा – विराट कोहली, शाहिद आणि मीरा कपूर यांनीही असंच काहीसं केलं होतं. तर काही सेलिब्रिटींनी मात्र तो ट्रेंड फॉलो न करता देवाच्या नावाने मुलांचं नाव ठेवलं. पण काही सेलिब्रिटी तर इतक वेगळं, अनोख नाव निवडतात, ज्याचा कोणीच विचारही करू शकत नाहीत, पण त्या नावाचा खूप मोठा अर्थ असतो. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनीही त्यांच्या मुलीचं असंच युनिक, राहा हे नाव ठेवलं. नुकतीच आई झालेली दीपिका ही आलिया किंवा अनुष्का शर्मा यांना फॉलो करणार का, तिच्या मुलीचं नाव काय ठेवणार याची अनेकांना उत्सुकता आहे.

लाडक्या लेकीचं नाव काय ठेवणार दीपिका ?

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांचे फॅन फॉलोइंग मजबूत आहे. इतर जोडप्यांप्रमाणेच चाहते त्यांना Deepveer म्हणतात. दोघांची नावे एकत्र करून हा हॅशटॅग बनवला आहे. दीपिकामधला ‘दीप’ आणि रणवीरचा ‘वीर’. मात्र, आता या हॅशटॅगचा ट्रेंड जोडप्याने मुलाचे नाव ठेवताना फॉलो करायला नको, अशी चाहत्यांची इच्छा आहे. आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय जोडप्यांनी तसे केले आहे. अनुष्का शर्माचंच पहा ना, तिच्या मुलीचं नाव वामिका आहे, विराटच्या ‘व’ आणि अनुष्काच्या नावातील ‘का’ हे अक्षर घेऊन तिचं नाव ठेवण्यात आलं. या नावाचा अर्थ देवी दुर्गा असाही होतो. मात्र, या जोडप्याने त्यांच्या मुलाचे नाव अगदी वेगळे ठेवले आहे. ‘अकाय’ चे अनेक अर्थ आहेत. त्यापैकी एक अर्थ शक्तिशाली असा आहे. हे नाव भगवान शंकरापासून प्रेरित आहे.

रणवीरची काय इच्छा ?

एका शोदरम्यान रणवीर सिंग स्पर्धकांशी बोलत होतो, तेव्हा त्याने मुलांच्या नावाबद्दल खुलासा केला होता. एका स्पर्धकाला उद्देशून तो म्हणाला की तुला वाईट वाटलं नाही तर मी शौर्यवीर सिंग,हे नाव वापरून शकतो. पण आता त्यांना मुलगी झाली आहे, त्यामुळे ते हे नाव तर वापरू शकत नाहीत. त्यांच्या चाहत्यांनी मुलीसाठी अनेक नावं सुचवली आहेत.

देवाच्या नावावरून ठेवलं बिपाशाच्या मुलीचं नाव

अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरला मुलगी झाली. आपल्या मुलीचे एक योद्धा राजकुमारी असे वर्णन करून त्यांनी आपल्या मुलीचे नाव देवी ठेवले. त्यांनी आपल्या मुलीचे नाव दुर् मातेच्या नावावरून ठेवलं. आता पदुकोण असाच ट्रेंड फॉलो करेल की नवीन ट्रेंड सुरू करेल, हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Raha चा अर्थ काय ?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा देखील चर्चेत असते. तिचे नाव अगदी अनोखे आहे. मात्र तिच्या आई-वडिलांच्या अक्षरातील नाव जोडून,तिचं नाव तयार केलेलं नाही. मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, तिचं आणि तिच्या वडिलाचं ( रणबीर कपूर) दोघांचही नाव ‘र’ वरून सुरू होतं. मात्र, आलियाने आपल्या मुलीचे नाव ठेवलं नाही. आजी नीतू कपूर यांनी ही जबाबदारी पेलली. राहा म्हणजे दिव्य मार्ग. अभिनेत्रीने तिच्या मुलीच्या नावाचा अर्थ वेगवेगळ्या भाषांमध्येही सांगितला होता.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.