‘गदर 2’चा धमाका सुरू असतानाच लागली आलिया आणि रणवीरच्या चित्रपटाची लाॅटरी, हा मोठा रेकाॅर्ड तयार करण्यात यश
रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट धमाका करताना दिसला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे दिसले होते. या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा या नक्कीच होत्या.
मुंबई : रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट (Movie) धमाका करताना दिसला. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत. आलिया आणि रणवीर सिंह हे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसले. रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा या सुरूवातीपासूनच होत्या. मात्र, रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोन मोठे चित्रपट रिलीज झाल्याने याचा फटका रॉकी और रानी की प्रेम कहानी बसेल असे सांगितले जात होते.
रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटानंतर सनी देओल याचा गदर 2 आणि अक्षय कुमारचा ओएमजी हे चित्रपट रिलीज झाले. मात्र, हे दोन्ही चित्रपट रिलीज झाल्यानंतरही रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट धमाका करताना दिसला. विशेष म्हणजे रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाने रिलीजच्या 21 व्या दिवशीही 1.4 कोटींचे कलेक्शन केले आहे.
आता नुकताच रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. हा चित्रपट हिट ठरला असून यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटासाठी आलिया भट्ट हिने खूप जास्त मेहनत घेतली होती.
राहा हिला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच या चित्रपटाचे गाणे शूट करताना आलिया भट्ट ही दिसली होती. विशेष म्हणजे गाण्याच्या शूटिंगसाठी आलिया भट्ट ही राहा हिला घेऊन कश्मीर येथे गेली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आलिया भट्ट ही या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली होती. गेल्या काही दिवसांपासून आलियाचे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत.
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातून रणवीर सिंह याला नक्कीच मोठा दिलासा हा मिळाला आहे. कारण गेले काही चित्रपट रणवीर सिंह याचे फ्लाॅप गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंह याचा सर्कस हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना चित्रपटाची टिम दिसली होती.
विशेष म्हणजे आता रणवीर सिंह हा डाॅन 3 मध्ये धमाका करताना दिसणार आहे. मुळात म्हणजे डाॅन 3 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. मात्र, शाहरूख खान हा डाॅन 3 मध्ये मुख्य भूमिकेत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता हे स्पष्ट झाले की, डाॅन 3 मध्ये रणवीर सिंह हा दिसणार आहे.