Ranveer Singh | रणवीर सिंहने कतरिना कैफ हिच्या समोर उडवली विकी काैशल याची खिल्ली, नेटकरी म्हणाले, अशी पत्नी कोणालाही…
रणवीर सिंह हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता रणवीर सिंह आणि आलिया यांची जोडी काय धमाल करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाका करताना दिसत नाहीयेत. सतत रणवीर सिंह याचे चित्रपट (Movie) फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंह याचा सर्कस हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना चित्रपटाची टिम दिसली होती. रोहित शेट्टी (Rohit Shetty) याचे चित्रपट शक्यतो बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कमाई करताना कायमच दिसतात. मात्र, याला सर्कस हा चित्रपट अपवाद ठरला आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. सर्कस चित्रपट फ्लाॅप गेल्याने तो एका प्रकारचा रणवीर सिंह याच्यासाठी झटका होता.
रणवीर सिंह याने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मात्र, कोरोनानंतर रणवीर सिंह याचे चित्रपट धमाका करू शकत नाहीयेत. आता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचा चित्रपट 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांची जोडी काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
सध्या रणवीर सिंह याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का देखील बसलाय. कारण चक्क या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह हा कतरिना कैफ हिच्यासमोरच विकी काैशल याची खिल्ली उडवताना दिसत आहे. रणवीर सिंह याचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
या पुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंह हा सूत्रसंचालन करताना दिसत असून कतरिना कैफ, विकी काैशल, करण जोहर असे बाॅलिवूडचे मोठे स्टार दिसत आहेत. सर्वांसमोरच विकी काैशल याची खिल्ली रणवीर सिंह हा उडवत आहे. मात्र, ज्यावेळी विकी काैशल याच्याबद्दल रणवीर सिंह हा बोलत आहे, त्यावेळी कतरिना कैफ ही हसताना दिसत आहे.
रणवीर सिंह याचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जुना आहे. मात्र, सध्या तो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, अरे ही कतरिना कैफ अशी कशी बायको आहे? आपल्या पतीचा अपमान होत असताना ही शांत बसून ऐकताना दिसत आहे. दुसऱ्याने लिहिले की, नवऱ्याची खिल्ली उडवली जात असताना ही शांत कशी बसून शकते. आता हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.