बिग बॉसने तुमच्या मुलावर पैसा लावला तरी..; रश्मी देसाईने विकी जैनच्या आईला फटकारलं

अंकिता लोखंडेच्या सासूने दिलेल्या विविध मुलाखती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. या मुलाखतींमध्ये त्यांनी अंकिताविषयी बरंच काही म्हटलंय. त्यावरून आता अभिनेत्री रश्मी देसाईने विकी जैनच्या आईला चांगलंच फटकारलं आहे. अंकिता काही रस्त्यावर राहत नव्हती, अशा शब्दांत तिने सुनावलंय.

बिग बॉसने तुमच्या मुलावर पैसा लावला तरी..; रश्मी देसाईने विकी जैनच्या आईला फटकारलं
रश्मी देसाईने घेतली अंकिता लोखंडेच्या सासूची शाळाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 10:44 AM

मुंबई : 12 जानेवारी 2024 | फॅमिली वीकदरम्यान बिग बॉसच्या घरात सून अंकिता लोखंडे आणि मुलगा विकी जैनची भेट घेतल्यानंतर रंजना जैन यांनी विविध मुलाखती दिल्या. या मुलाखतींमध्ये त्या सातत्याने अंकिताविरोधात वक्तव्ये करताना दिसल्या. एका मुलाखतीत त्यांनी असाही खुलासा केला की विकीच्या कुटुंबीयांना अंकितासोबतच्या लग्नाला स्पष्ट विरोध होता. तर दुसऱ्या मुलाखतीत त्यांनी अंकितावर बराच पैसा खर्च केल्याचं म्हटलं. या सर्व वक्तव्यांचा आता अभिनेत्री रश्मी देसाईने चांगलाच समाचार घेतला आहे. अंकिताची खास मैत्रीण रश्मी तिच्या बाजूने उभी राहिली आहे. रश्मीने अंकिताच्या सासूच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत त्यावर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

रश्मी देसाईने अंकिताच्या सासूला फटकारलं

रश्मीने लिहिलं, ‘मला माफ करा आंटी. तिला कधीच हा शो करायचा नव्हता. विकास जैनच्या प्रेमापोटी तिने हा शो केला आणि खर्च उचलावे लागतात याचा काय अर्थ आहे आंटी? त्या दोघांनी प्रेमविवाह केला आणि त्याआधीही ती रस्त्यावर राहत नव्हती. ती अंकिता लोखंडे आहे. जरी बिग बॉसने तुमच्या मुलावर पैसा लावला असला तरी आमची मुलगीसुद्धा खरं सोनं आहे. सर्वांचा एक वैयक्तिक संघर्ष असतो. पण त्यांचं लग्न टिकावं अशी तुम्ही इच्छा नाही का? प्रत्येक पती-पत्नीमध्ये भांडणं होतात आणि हा शोसुद्धा कठीण आहे. दोन दिवसांत तुमची ही अवस्था आहे. चार महिने बिग बॉसच्या घरात राहिलात तर तुम्हाला तिथला त्रास समजेल. मी तुमचा आदर करते, नेहमी करेन. पण इथे तुम्ही चुकताय.’

हे सुद्धा वाचा

अंकिताची सासू प्रत्येक गोष्टीत मुलगा विकीचीच साथ देत असल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. बिग बॉसच्या घरातही अंकिता आणि रंजना यांच्यात बाचाबाची झाली. विकीला लाथ मारल्याच्या घटनेवरून रंजना अंकिताला सुनावतात. “ज्यादिवशी तू लाथ मारली होतीस ना, तेव्हा पापाने लगेच तुझ्या मम्मीला फोन केला. तुम्ही तुमच्या पतीला अशीच लाथ मारायचे का, असं त्यांना विचारलं”, असं सासू म्हणते. हे ऐकून अंकिता चिडते आणि आईला फोन करण्याची काय गरज होती, असा सवाल सासूला करते. काही दिवसांपूर्वीच वडिलांचं निधन झालंय, त्यामुळे तुम्ही आईला काही बोलू नका, अशी विनंती ती त्यांच्यासमोर करताना दिसते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.