Rashmika Mandanna | बॉलिवूडमध्ये एंट्री करताच वधारले रश्मिकाचे मानधन, ‘बिग बीं’सोबत काम करण्यासाठी आकारली ‘इतकी’ रक्कम!

आगामी चित्रपटात रश्मिका, महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमवेत स्क्रीन शेअर करणार आहे.

Rashmika Mandanna | बॉलिवूडमध्ये एंट्री करताच वधारले रश्मिकाचे मानधन, ‘बिग बीं’सोबत काम करण्यासाठी आकारली ‘इतकी’ रक्कम!
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 3:28 PM

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा​​सोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून ती बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या चित्रपटानंतर नुकताच रश्मिकाने विकास बहलच्या ‘डेडली’ हा आगामी चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटात रश्मिका, महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमवेत स्क्रीन शेअर करणार आहे. यापूर्वी कतरिना कैफला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. परंतु, काही कारणांनी तिने या चित्रपटास नकार दिला. त्यानंतर कृती सेनॉनच्या बाबतीतही असेच काही घडले. अखेर आता रश्मिकाला या चित्रपटासाठी फायनल करण्यात आले आहे. पदार्पणातच दोन बिग बजेट चित्रपटांमुळे रश्मिकाने मानधनात देखील वाढ केली आहे (Rashmika Mandanna charges a big amount for signing Bollywood movie with Amitabh Bachchan).

अद्याप विकास बहलच्या ‘डेडली’ चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, बॉलिवूडमध्ये पाऊल टाकताच रश्मिकानेही स्वतःची फी वाढवल्याची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडचा नवा चेहरा

पिंकविलाच्या अहवालानुसार एकता कपूरला तिच्या आगामी चित्रपटासाठी एक नवा चेहरा हवा होता. विकास बहलने रश्मिका मंदनाला ही स्क्रिप्ट ऑफर केली आणि ती तिला आवडली. बॉलिवूडमध्ये नवीन असूनही, रश्मिका एका चित्रपटासाठी 5 ते 6 कोटी रुपये आकारात आहे. मात्र, रश्मिकाच्या होकारामुळे निर्माते खूश आहेत आणि तिला या चित्रपटासाठी साईन केले गेले आहे.

‘डेडली’ हा एक विनोदी चित्रपट असून, तो विकास बहल दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रश्मिका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘डेडली’मध्ये नीना गुप्ता आणि इतरही अनेक कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित असेल. ‘डेडली’ हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटची निर्मिती असणार आहे.

लवकरच चित्रीकरणाला सुरुवात

‘मिशन मजनू’च्या चित्रीकरणानंतर रश्मिका ‘डेडली’च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. रिपोर्ट्सनुसार सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’चे चित्रीकरण फेब्रुवारी 2021मध्ये सुरू होईल, जे एप्रिल 2021मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर लवकरच रश्मिका ‘डेडली’च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

रश्मिकाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

रश्मिका मंदानाने साऊथच्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. आता रश्मिका ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. याबद्दल रश्मिका म्हणते की, मला विविध भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे, याचा मला खूप आनंद आहे. पुढे म्हणते की, या चित्रपटाची कथा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, याबद्दल मी निर्मात्यांची आभारी आहे की, त्यांनी मला या चित्रपटाची ऑफर दिली. या चित्रपटात काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत माझा प्रवास सुरू झाल्याने आणि नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप उत्साही आहे.

(Rashmika Mandanna charges a big amount for signing Bollywood movie with Amitabh Bachchan)

हेही वाचा :

छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.