“ते बऱ्याच महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये होते, पण..”; नसीरुद्दीन शाह यांच्याविषयी पत्नीचं वक्तव्य

1975 मध्ये नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक हे सत्यदेव दुबे यांच्या ‘संभोग से संन्यास तक’ या नाटकाच्या तालमीदरम्यान पहिल्यांदा भेटले होते. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 1982 मध्ये लग्न केलं. सुरुवातीच्या विरोधानंतर रत्ना यांच्या कुटुंबीयांनी या लग्नाला होकार दिला होता.

ते बऱ्याच महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये होते, पण..; नसीरुद्दीन शाह यांच्याविषयी पत्नीचं वक्तव्य
Naseeruddin Shah and Ratna PathakImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 4:07 PM

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक यांची पहिली भेट एका नाटकाच्या तालमीदरम्यान झाली होती. नाटकात काम करता – करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 1982 मध्ये लग्न केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रत्ना त्यांच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. नसीरुद्दीन शाह यांच्या भूतकाळामुळे कधीच फरक पडला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट कलं. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत रत्ना यांनी शाह यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीबद्दलही सांगितलं.

“आम्ही एकत्र एका नाटकात काम करत होतो. संभोग से संन्यास तक असं त्या नाटकाचं नाव होतं. नाटकात काम करता करता आम्हाला हे कळून चुकलं होतं की, आम्हाला एकत्र राहायचंय. आम्ही दोघंही वेडे होतो, त्यामुळे एकमेकांना आम्ही फारसे प्रश्न विचारले नाही. आजच्या काळात लोकं अनेक योग्य प्रश्न विचारतात. आम्ही फक्त इतकाच विचार केला होता की, हे चांगलं वाटतंय, करून पाहू. सुदैवाने तेच आमच्यासाठी योग्य होतं. ते सर्व अत्यंत आश्चर्यकारक होतं. त्यासाठी मी कुठलंही श्रेय घेणार नाही. पण दोघांमधील गोष्टी योग्यरित्या घडून आल्या होत्या”, असं त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

रत्ना पाठक यांच्याआधी नसीरुद्दीन शाह यांचं पहिलं लग्न झालं होतं. पतीच्या भूतकाळाविषयी त्या पुढे म्हणाल्या, “मला त्यांच्या भूतकाळाविषयी काहीच चिंता नव्हती. मी फक्त प्रेमात होते. ते त्यांच्या पूर्व पत्नीपासून फार आधीच विभक्त झाले होते. त्यानंतरच्या काळात ते बऱ्याच रिलेशनशिप्समध्येही होते. मात्र तोसुद्धा त्यांचा भूतकाळच होता. मग त्यांच्या आयुष्यात मी आले. जोपर्यंत मी त्यांच्या आयुष्यातील अखेरची असेन, तोपर्यंत मला काहीच फरक पडत नाही.”

“लग्नाच्या एक आठवड्यानंतर आम्ही हनिमूनला गेलो होतो आणि तिथूनही आम्हाला मधेच परतावं लागलं होतं. कारण त्यांना जाने भी दो यारो या चित्रपटासाठी शूटिंग करायची होती. त्यानंतर बरेच दिवस आमची भेटसुद्धा झाली नव्हती. ते सर्वांत उत्तम आणि कठीण शूट होतं. नसीर तीन दिवसांनंतर यायचे आणि त्यांच्याबद्दल मला कोणतीच माहिती नसायची. ती वेळच खूप वेगळी होती”, असं रत्ना पाठक यांनी सांगितलं.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.